यवतमाळ वाशिम मतदार संघात विदर्भातली खरी अस्तित्वाची लढत
पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांना डच्चू, लढत मात्र महाविकास आघाडीचे संजय देशमुख व महायुतीचे राजश्री पाटील यांच्यामध्ये मतदारांमध्ये मात्र संभ्रम
दैनिक विश्वजगत ः प्रविण रोडे
दिग्रस : महाराष्ट्रामध्ये गाजलेला यवतमाळ वाशिम मतदार संघातला तीडा मात्र शेवटी सुटला आखेर शेवटच्या दिवशी उमेदवार जाहीर करून राजश्री पाटील यांना माहा युतीकडून उमेदवारी जाहीर झाली ,, मात्र उभाटा गटाचे उमेदवार श्री संजय देशमुख यांची उमेदवारी आधीच पक्की झाली असताना त्यांनी प्रचाराला पंधरा दिवसा आधीपासूनच सुरुवात केली होती आणि त्यांनी यवतमाळ वाशिम मतदार संघ पूर्ण कुंजून काढला आणि प्रत्येक गावी भेटी सुद्धा देताना त्यांचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे
दिग्रस : महाराष्ट्रामध्ये गाजलेला यवतमाळ वाशिम मतदार संघातला तीडा मात्र शेवटी सुटला आखेर शेवटच्या दिवशी उमेदवार जाहीर करून राजश्री पाटील यांना माहा युतीकडून उमेदवारी जाहीर झाली ,, मात्र उभाटा गटाचे उमेदवार श्री संजय देशमुख यांची उमेदवारी आधीच पक्की झाली असताना त्यांनी प्रचाराला पंधरा दिवसा आधीपासूनच सुरुवात केली होती आणि त्यांनी यवतमाळ वाशिम मतदार संघ पूर्ण कुंजून काढला आणि प्रत्येक गावी भेटी सुद्धा देताना त्यांचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे पण शेवटच्या दिवशी उमेदवारी मिळाल्या नंतर श्री राजेश्री पाटील महा युती कडुन उमेदवार यांना मात्र प्रचारासाठी थोडासा वेळ कमी मिळेल पण ते प्रचार कोणत्या प्रकारे करतात आणि कशाप्रकारे करतात हे मात्र प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रत्येक यवतमाळ वाशिम मतदार संघातील प्रत्येक गावात पोहोचू शकतात का हा विषय आहे कारण त्या यवतमाळ जिल्ह्यातील लेक आहे पण त्यांचे सासर हे नांदेड आहे ,त्यामुळे त्यांना प्रत्येक गावात ओळख निर्माण करून मतदारांना पटवून देणे इतकं यवतमाळ वाशिम मतदार संघत सोपं नाही ह्या गोष्टी काही मतदाराकडून ऐकण्यात येत आहे
यवतमाळ मधील पालकमंत्री संजय राठोड हे त्यांच्यासोबत असून खासदार भावना गवळी यांच्या अजूनही प्रतिक्रिया दिसल्या नाही आणि मुख्यमंत्री महोदय यवतमाळला आले असता ते त्या कार्यक्रमाला, दिसल्या सुद्धा नाही आणि पण त्या नामांकन भरण्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री महोदयांनी खासदार भावना गवळी यांच्या आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही असे शब्द सुद्धा दिले होते पण भावना गवळी ह्या राजश्री पाटील यांच्या प्रचाराला उतरतात का काय हा प्रश्न सुद्धा निर्माण होत आहे
भावना गवळी यांच्या जवळच्या कार्यकर्त्या बद्दल खासदार भावना गवळी यांना तिकीट न। मिळाली म्हणून त्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री महोदय यवतमाळ आले असता त्या कार्यकर्त्यांनी तिकीट न दिल्यामुळे जाहीर नाराजी सुद्धा व्यक्त केली होती ते कार्यकर्ते राजश्री पाटील यांना मदत करतील की काय हा प्रश्न सुद्धा निर्माण होत आहे
पण महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीतील सर्व नेते प्रचाराला लागलेले आहे म्हणजे महा विकाश आघाडीकडुन त्यांना कोणाचाही विरोध नाही असे चित्र स्पष्ट दिसत आहे पण शेवटी जनताच कोणता उमेदवार निवडून दिल ते 4 जूनला समजणार आहे त्यामुळे प्रचार कोणाचा जास्ती चालू आहे आणि कोणाचा कमी चालू आहे आणि कोणाकडे कोण आहे हे समजणे इतकं बरं नव्हे
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी कडून अधिकृत उमेदवार अभिजीत राठोड यांचा अर्ज शुक्रवारी झालेल्या छानणीत रद्द झाला असून त्यामुळे या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे मतदान कोणाकडे जाईल। शेवटी संजय देशमुख राजश्री पाटील यांच्यातच लढत आहे त्यामुळे या दोघांपैकी कोण निवडून येणे हे 4 जूनला समजणार आहे।
हिंगोली मधील खासदार हेमंत पाटील यांची हिंगोली मतदारसंघातील तिकीट कापून यांच्या पत्नीला यवतमाळ जिल्ह्यात लोकसभेची तिकीट देणे हे आणि पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांची तिकीट कापून श्री राजश्री हेमंत पाटलांना तिकीट देणं याबद्दल मतदार सुद्धा संभ्रम मा मधे आहे