Veterans are shocked by signs.! :दिग्गजांना चिन्हांमुळे धक्का.!
गॅस सिलेंडर मिळाले अन्….
उमेदवारांच्या डोळ्यातून अश्रूधारा.
लोकसभेच्या उमेदवारांना चिन्ह प्रक्रियेचीही जान नाही.
तर चिन्हांमध्ये पत्रकारांचाही महाप्रताप.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील पात्र उमेदवारांना चिन्ह वाटप प्रक्रियेत कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली. तर नामांकन अर्ज परत घेणाऱ्यांमध्ये पाटील आणि राजेंची घर वापसीही झाली. यासह तीन अपक्ष उमेदवारांनीही घरवापसी केली.मागील 48 तासात सर्वांची मनधरणी,आमीश आणि धमक्यांचे सत्र यामुळेबिहारराज सुद्धा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाने अनुभवले.
त्याअनुषंगाने आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी , केंद्रीय निरीक्षक, बुलढाणा जिल्हा परिषदचे कॅफो,यासह पोलीस अधीक्षक दर्जाचे स्पेशल सुरक्षा अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, एसडीओ, यांच्या समोर काही उमेदवारांनी जीवाला धोका असल्यामुळे सुरक्षेचीही मागणी केली. हा सर्व प्रकार इन कॅमेरा घडलेला आहे.
आठ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजे नंतर उमेदवारी अर्ज वापस घेण्याची प्रक्रिया बंद झाली . त्यानंतर लगेच चिन्ह वाटपासाठी महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली.बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील पात्र उमेदवारांना चिन्ह वाटप प्रक्रियेत कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली. तर नामांकन अर्ज परत घेणाऱ्यांमध्ये पाटील आणि राजेंची घर वापसीही झाली. यासह तीन अपक्ष उमेदवारांनीही घरवापसी केली.मागील 48 तासात सर्वांची मनधरणी,आमीश आणि धमक्यांचे सत्र यामुळेबिहारराज सुद्धा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाने अनुभवले.
त्याअनुषंगाने आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी , केंद्रीय निरीक्षक, बुलढाणा जिल्हा परिषदचे कॅफो,यासह पोलीस अधीक्षक दर्जाचे स्पेशल सुरक्षा अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, एसडीओ, यांच्या समोर काही उमेदवारांनी जीवाला धोका असल्यामुळे सुरक्षेचीही मागणी केली. हा सर्व प्रकार इन कॅमेरा घडलेला आहे.निवडणूक चिन्हाच्या प्रक्रियेमध्ये भावी खासदारांचे अज्ञानही या निमित्ताने समोर आले. तर यावेळी वंचित बहुजन आघाडी, शिवसेना महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार, व त्यांचे प्रतिनिधीही या महत्त्वपूर्ण बैठकीला अनुपस्थित होते. यावरून लोकशाहीतील सर्व महत्त्वपूर्ण प्रक्रियेला भावी खासदारांच्या दृष्टीने किती महत्त्व आहे याचा प्रत्यय नक्कीच येतो. आजच ही परिस्थिती आहे तर पुढे काय..? या अनुषंगाने काही खळबळ जनक बाबी समोर आल्या. गल्ली ते दिल्ली उड्या मारणाऱ्या दिग्गज नेत्यांना त्यांच्या प्रतिनिधींना चिन्ह मिळविण्याची प्रक्रियाच माहित नसल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले. देशाच्या सर्वात मोठ्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतांना कधी नव्हे 29 उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यातील काही अधिकृत राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी उमेदवार यांना प्रतिज्ञा लेखही पूर्ण भरता आला नाही. की…जाणीवपूर्वक माहिती लपविण्यात आली. ही बाब या ठिकाणी अधोरेखित करावीच लागेल.कारण याकडे वास्तव मीडिया कधी पाहत नाही. निर्दशनात आलेही असेल तर मांडण्याची हिंमत नाही हे सत्यही आता वाचकांसमोर जिल्हा वासियांसमोर आलेच पाहिजे. लोकशाहीतील सर्वात मोठ्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उमेदवारी भरतांना कमीत कमी निवडणूक प्रक्रियेची जाण असणे जिल्ह्यातील जनतेला अपेक्षित असते. यावेळी ईव्हीएम किंवा निवडणुकीच्या बॅलेट पेपरवर मान्यता प्राप्त नसलेले चिन्ह पाच उमेदवारांनी टाकले.ज्यामुळे अधिकाऱ्यांसमोर जिल्ह्यातील उमेदवारांची प्रतिमाही उजाळल्या गेली. प्रस्तावक, प्रतिनिधी, वकील , उच्च पदस्थ वरिष्ठ पत्रकार , यांच्यासह संस्कृती,संस्कार व शिस्तबद्ध असलेल्या विद्यालयाचे बारामतीकर शिक्षकही काही उमेदवारांसोबत अर्ज भरणे आणि चिन्हाची निवड करण्यासाठी पंधरा दिवसापासून शक्कल लढवित होते. असे असतांना अधिकृत चिन्ह कोणते आणि अनधिकृत चिन्ह कोणते याचीही जाण या सर्व प्रखांड पंडितांनाही नसल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे दिग्गज उमेदवार आणि त्यांच्या प्रस्तावकांना सर्वांच्या समोर नामुष्कीला सामोरे जावे लागले. त्यातील सामान्य उमेदवारांचा विषय सोडा परंतु चळवळीतील प्रसिद्ध कार्यकर्ते, पत्रकार आणि अधिकृत रजिस्टर पक्षाच्या उमेदवारांनाही चिन्हाची जाण नसल्याचे समोर आले. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले अधिकारी कर्मचारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील चतुर्थ क्लास कर्मचारी सेवकांनाही आश्चर्य वाटले. आपण नगरपरिषद किंवा ग्रामपंचायतच्या उमेदवारीसाठी नव्हे तर चक्क देशाच्या सर्वोच्च असलेल्या संसदेतील खासदार लोकप्रतिनिधी म्हणून समोर येत आहोत. बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक सुज्ञ आहेत. जर अशा उमेदवारांना आपण नेतृत्व देऊन संसदेत पाठवणार असाल तर आपलं भविष्य नक्कीच अंधकारमय झाल्याशिवाय राहणार नाही.
निवडणूक प्रक्रियेत राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवारांना राखीव चिन्ह दिल्या जाते. तर त्यानंतर रजिस्टर अनरेकग्नाईज पक्षाच्या उमेदवारांच्या चिन्हांचे वाटप होते.त्यानंतर अपक्षांना होते.
रजिस्टर अनरेकग्नाईज राष्ट्रीय पक्षांमध्ये महालोकशाही विकास आघाडीचे असलम शहा, राज्य पक्षाचे वंचित बहुजन आघाडीचे वसंत मगर, आणि एका राज्य पक्षाचे नांदवे यांनी गॅस सिलेंडर या चिन्हासाठी प्रथम दावा केला होता. नियमानुसार प्रथम आलेल्या अर्जाचा विचार करणे क्रमप्राप्त असते. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा अर्ज प्रथम होता. तसा युक्तिवादही असलम शहा यांचे प्रतिनिधी अँड रोठे पाटील यांनी केला. परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो मान्य केला नाही.परंतु अंतिम निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा असतो. त्यानुसार त्यांनी ईश्वर चिट्ठीचा निर्णय जाहीर केला. त्यामध्येही महालोकशाही विकास आघाडीचे असलम शाह यांच्याच नावाची चिठ्ठी निघाली. यावेळी ऍड. रोठे पाटील आणि असलम शहा यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अश्रूंमध्ये परावर्तित झाला. म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय यावेळी आला. असलम शहाही रमजानचे रोजा धारी आहेत. शेवटी चिन्हाची लढाई नियमानुसार आणि नशिबानुसारही असलम शहा यांनी जिंकली. सर्व प्रक्रिया शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि लोकशाही प्रक्रियेच्या कटिबद्धतेने संपन्न झाली.निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या सदर महत्त्वपूर्ण बैठकीत बीएसपी चे मधाडे यांना हत्ती, महायुतीचे प्रताप जाधव यांना धनुष्यबाण, महाआघाडीचे नरेंद्र खेडेकर यांना मशाल, महालोकशाही विकास आघाडीचे अस्लम शहा हसनशहा यांना सिलेंडर हे चिन्ह रजिस्टर राष्ट्रीय पक्ष म्हणून प्रथम घोषित झाले. त्यानंतर इतर अपक्षांच्या चिन्हांची प्रक्रिया सुरू झाली. या सर्व प्रक्रियेची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी क्रमवारीप्रमाणे याद्या बनवून जाहीर केली. असे असताना हुजरेगिरी करणाऱ्या एका संपादकांने उमेदवारांचे चिन्ह जाहीर करतांना स्वतःच्या मर्जीतील उमेदवारांना वरती स्थान देत इतरांचा क्रमांक खालीवर केला. यावर सविस्तर उद्याच्या विश्लेषणात संवाद साधूया._
तूर्तास एवढेच.
✍🏻 अँड.सतीशचंद्र रोठे पाटील
राजकीय विश्लेषक, महाराष्ट्र.
9637230999