Three lakh 67 thousand was stolen overnight in the village of Mandal in Amalner taluk. :अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील गावात रात्रीतून तीन लाख 67 हजाराची चोरी.

अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील गावात रात्रीतून चोरट्यांनी राहत्या घरातील कपाटीतून तीन लाख 67 हजार पाचशे रुपयाची चोरी करून चोरट्यांनी पोबारा केला .

दैनिक विश्‍वजगत ः यदुवीर पाटील
अमळनेर : अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील गावात रात्रीतून चोरट्यांनी राहत्या घरातील कपाटीतून तीन लाख 67 हजार पाचशे रुपयाची चोरी करून चोरट्यांनी पोबारा केला .याबाबत सविस्तर वृत्त असे की येथील गावातील नागरिक नितीन मोतीलाल पाटील यांच्या घरातून दोन लाख वीस हजार रुपये, दागिने , टोंगल,चांदीचे कडे इत्यादी तसेच मनीषाबाई हेमंत ठाकूर दहा हजार रुपये व मोबाईल ,महेश नामदेव ठाकूर 50 हजार रुपये, रमेश मधुकर कुलकर्णी पंचवीस हजार रुपये ,गुलाब निळकंठ पाटील यांच्या शेतातून पाण्याची इलेक्ट्रिकल्स मोटर किंमत दोन हजार रुपये व वस्तू घेऊन चोरटे पसार झाले याबाबत संबंधित मारवड पोलीस स्टेशनला फिर्यादी नितीन पाटील यांच्या सांगण्यावरून तक्रार नोंदविण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शीतल कुमार नाईक हे करत आहेत.या परिसरातील गावात नियमित रात्रीतून पोलीस पथकाकडून ग्रस्त घालण्यात येत असते. रात्री २ वा. तसेच कधी ३ ते ४ या सुमारास प्रत्यक्ष येथील पोलीस अधिकारी आपल्या पोलीस कर्मचारी यांच्या सोबत स्वतः ग्रस्तीत असतात. परंतु चोरटे हे नियोजित योजना करून चोरी करण्यात माहीर असल्याचे बोलले जात आहे. मांडळ ते वावडे गावा दरम्यान येथील पेट्रोल पंप जवळ चोरट्यांना दहशत निर्माण होईल यासाठी रस्त्यावरती बेरिकेट्स लावण्याची मागणी नागरिकांकडून होत असताना दिसत आहेत. या परिसरातून यापूर्वी गुरांची तसेच शेती पंप मोटार यांची मोठ्या प्रमाणत चोरी झाली आहे. मांडळ या गावातून अनेक दुकाने यापूर्वी चोरट्यांनी फोडली होती. या परिसराततील चोऱ्यांवर आढा बसून त्यांना जेरबंद करण्याची मागणी होत आहे.