The Zingat Gang’s Bhingat attacks claimed yet another victim: झिंगाट गँगच्या भिंगाट हल्ल्यांनी घेतला पून्हा एकबळी.


महापुरुषांच्या मिरवणुकीवर दहशतीचे सावट.

गजानन काटे : दैनिक विश्‍वजगत

बुलढाणा शहर पोलीस स्टेशन समोरून महापूरूषांची मिरवणूक जात असतांना शहर पोलीस स्टेशन समोरच मिरवणुकीतून आशूतोष पडघानला झिंगाट गँगच्या सदस्यांनी बाहेर ओढत आनले. नंतर शहर पोलीस स्टेशनच्या बाजूला नेऊन त्यावर चाकूचे असंख्य वार केले गेले. हा सर्व प्रकार पाहणारे ही उपस्थित आहेतच. तर बघायची भूमिका घेणाऱ्यांमध्ये काही पोलीस कर्मचारीही असल्याचे प्रत्यक्ष दर्शनींनी दिलेल्या माहितीवरून समोर येत आहे.
आशुतोष पडघानला गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचीही झालंर आहेच. तर पूर्व वैमनस्यातून सदर हल्ला सुनियोजित कटकारस्थान असल्याचेही माहीती समोर येत आहे.
मिरवणूक उत्साहात सुरू असतांना आनंदावर विरजण टाकणारी दुःखद घटना 14 एप्रिल ला सायंकाळी घडली. यापूर्वी महापुरुषांच्या जयंतीत झिंगाट गँगच्या भिंगाट हल्ल्यांनी सामान्य नागरिकांमध्ये दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. महापुरुषांच्या जयंतीत यापूर्वी अशा दुर्घटना घडलेल्या आहे परंतु तरीही पोलीस यंत्रणा बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने या प्रत्येक प्रकरणात आता लक्ष देतील हे परंतु दक्षता बाळगली असते तर एक हत्या टाळू शकले असती. महापुरुषांच्या जयंतीला गालबोट लागले नसते. याला सर्वस्वी पोलीस प्रशासनच जबाबदार धरून चालणार नाही.तर पोलिसांवरही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा कोणी दबाव तर टाकत नाही न..!
यावरही आता वरिष्ठांनी लक्ष देणे क्रमप्राप्त प्राप्त आहे. याला जिल्ह्यातील अनधिकृत व्यवसायही कारणीभूत आहे. ज्यामुळे स्थानिक गाव गुंडावर पोलीस प्रशासनाचा वचक राहिला नाही. हे पुन्हा सिद्ध झाले आहे. जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला पायबंध लावण्यासाठी सुज्ञ नागरीक, नेते, सामाजिक कार्यकर्ते,पक्ष, संघटना या अनुषंगाने निषेध नोंदवतील का.! जिल्ह्यात शहरात भयमुक्त वातावरण राहण्यासाठी अशा प्रकरणांची चौकशी करण्याची,किंवा संबंधित हत्या करणाऱ्या गुंडांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची साधी मागणी करण्यालाही धजावतील का!