Students took out a rally for voting awareness at Sathegaon: साठेगाव येथे मतदान जनजागृती साठी विद्यार्थ्यांनी काढली रॅली
दैनिक विश्वजगत ः अनिल दराडे
सिंदखेडराजा: सिंदखेडराजा तालुक्यातील साठेगाव येथे मतदान जनजागृती होणाऱ्या सर्वच निवडणुकीत मतदानाची टक्केवारीत वाढ होण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाच्या वतीने मतदान जनजागृती करण्याकरिता स्वीप मोहीम राबविण्यात येत आहे .विशेष करून नविन मतदारांना निवडणूक प्रक्रिये बद्दल माहिती व्हावी या करीता विविध उपक्रम राबविले जात आहेत.

जीवन विकास विद्यालय साठेगाव यांच्या वतीने गावातून रॅली काढन्यात आली या रॅली मधे विद्यार्थांच्या हातात जनजागृतीचे संदेश देणारे फलक होते या मधे आपले मत आपले भविष्य ,मतदान करा मतदान करा ,गो फॉर वोट , असे फलक झळकत होते .या रॅली दरम्यान निवडणूका ह्या लोकशाही प्रक्रियेचा कणा असल्यामुळे योग्य पद्धतीने केलेले मतदान आपल्या हक्काचे रक्षण करण्याच्या दृष्टीने टाकलेले पाहिले पाऊल असते . या रॅली मधे मुख्याध्यापक वणवे सर झोटे सर सानप सर चाटे सर देशमुख सर गायकवाड सर विजय सानप सर खरात मॅडम व कर्मचारी यांनी सहभाग घेतला .