Rajshree Patil in the shadow of defeat! : राजश्री पाटील पराजयाच्या छायेत!
खासदार हेमंत पाटील हे सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदार संघातुन निवडुन आले होते त्यांच्या ५ वर्षाच्या कालावधित ते ५वर्षे जनतेच्या संपर्काच्या कोसो दुर होते मागिल लोकसभा निवडणुकीत भाजपा,शिवसेना,रिपाइं यांची युती होती यूतीमधील सर्वच पक्षांनी निष्ठापुर्वक काम करुन हेमंत पाटलांना भरघोष मतांनी निवडुन आणले होते निवडणुकीपुर्वी हेमंत पाटलानी अनेक आश्वासन दिली होती
दैनिक विश्वजगत ःअशोकराव राऊत
महागांव : हिंगोली लोकसभा मतदार संघात खासदार हेमंत पाटील हे सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदार संघातुन निवडुन आले होते त्यांच्या ५ वर्षाच्या कालावधित ते ५वर्षे जनतेच्या संपर्काच्या कोसो दुर होते मागिल लोकसभा निवडणुकीत भाजपा,शिवसेना,रिपाइं यांची युती होती यूतीमधील सर्वच पक्षांनी निष्ठापुर्वक काम करुन हेमंत पाटलांना भरघोष मतांनी निवडुन आणले होते निवडणुकीपुर्वी हेमंत पाटलानी अनेक आश्वासन दिली होती त्या आश्वासनाचा हेमंत पाटलांना विसर पडून मतदार संघातील यूतीतील पक्षाच्या कोसो दूर राहुन त्यांचा युतीतील पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पुर्णपणे संपर्क तोडून टाकला होता हेमंत पाटील कार्यकर्त्यांचे फोनही उचलत नव्हते कार्यकर्त्यांचा व हेमंत पाटलाचा मतदार संघात समस्याच समस्या होत्या त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्नही केला नाही हिंगोली मतदार संघातील खासदार अज्ञातवासात असल्याची परीस्थिती होती त्यामुळे हेमंत पाटलाविषयी हेमंत पाटलाविषयी कार्यकर्त्यांत असंतोष पसरला होता जनता व कार्यकर्त्यांना हेमंत पाटील शोधून सापडत नव्हते वास्तविक पाहता राजकारणात जनता कार्यकर्ता व नेता असे समिकरण असणे आवश्यक असते परंतू हिंगोली मतदार संघात या समिकरणाला हेमंत पाटील यानी मुठमाती देऊन कार्यकर्ता व जनता यांना कवडीचीही किंमत न देता हेमंत पाटील मतदार संघातील कार्यकर्ता व जनता यांचे आपण मालक असल्याचे आवीर्भावात राहुन मतदार संघातील जनतेच्या कोसो दुर गेले त्यामुळे हिंगोली मतदार संघातील जनतेमध्ये हेमंत पाटलाप्रती रोष व्यक्त होत होता अशापरिस्थितीत हेमंत पाटलांनी पक्षांतर करून मतदारांचा विश्वासघात केल्याने हेमंत पाटलाविषयी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी दिसुन येत होती
अशा परिस्थितीत शिवसेना शिंदे गटाने हेमंत पाटलांना हिंगोली मतदार संघात उमेदवारी दिली त्यामुळे लोकांत असंतोष पसरल्याने हेमंत पाटील यांचे उमेदवारीला मोठ्या प्रमाणात विरोध झाला त्यामुळे पक्षाने त्यांची उमेदवारी रद्द केली त्यानंतर नाट्यमय पध्दतीने केविलवाने होऊन त्यांचे पत्नी राजश्री पाटील यांना वाशिम,यवतमाळ लोकसभा मतदार संघाची उमेदवारी दिली गेली वाशिम ,यवतमाळ लोकसभा मतदार संघ व हिंगोली लोकसभा मतदार संघ अगदी जवळच असल्याने हेमंत पाटलानी केलेले कारनामे जनतेला माहित झाले असुन हेमंत पाटील खासदार असताना नांदेड येथिल शंकरराव चव्हान रुग्णालयातील आदिवासी समाजाचे अधिष्ठाता वाकडे यांना रूग्णालयातील शौचालय साफ करायला लावले होते त्यामुळे आरोग्य विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी हेमंत पाटलाचा निषेध नोंदविला होता एवढेच नव्हे तर हेमंत पाटलाविरोधात अनुसुचित जाती अनुसुचित जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत नांदेड येथिल पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता याचा परीणाम व भय जनतेच्या मनात असुन हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना मतदान केले तर यापुढे सुध्दा यांच्यामुळे अन्याय अत्याचार वाढतील यासाठी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघातील जनता राजश्री पाटील यांना मतदान करतील असे वाटत नाही त्यामूळे राजश्री पाटील ह्या पराजयाच्या छायेत असुन राजश्री पाटलाचा पराजय अटळ असुन यासाठी कुठल्याही भविष्यवेत्याला बोलाविण्याची गरज पडणार नाही