Prataprao vs TSK: लोकसभा मतदारसंघात शेतकरी नेते रविकांत तुपकर तर महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव यांनी जंगी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. तर एक एक रुपयाची नाणी जमा करून महा लोकशाही विकास आघाडीचे उमेदवार असलम शहा यांनी वेगळ्या पद्धतीने अर्ज दाखल केल्याने देशभर चर्चेचा विषय ठरला.
अँड.सतीशचंद्र रोठे पाटील/बुलढाणा: लोकसभा मतदारसंघात शेतकरी नेते रविकांत तुपकर तर महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव यांनी जंगी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. तर एक एक रुपयाची नाणी जमा करून महा लोकशाही विकास आघाडीचे उमेदवार असलम शहा यांनी वेगळ्या पद्धतीने अर्ज दाखल केल्याने देशभर चर्चेचा विषय ठरला.
तेवढ्याच ताकतीचे शक्ती प्रदर्शन करीत संदीप शेळकेंचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. महाआघाडीचे शिवराणा नरुभाऊ खेडेकर 4 एप्रिल ला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तर काँग्रेस मधील राजीनामा दिलेले पदाधिकारी पुन्हा महाआघाडीच्या उमेदवारांसोबत येतील किंवा नाही…? यामुळे अद्यापही नरूभाऊंच्या कार्याला गती येण्यास अडथळास येत आहे.
तर अभी पिक्चर बाकी है म्हणत लोकसभा रणसंग्रामात उतरण्याचे संकेत दादांनी फेसबुक पेज वरून दिले होते. परंतु उमेदवारी दाखल करून अर्ज परत घेण्याची दुसऱ्यांदा वेळ येऊ नये…! की शेवटच्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करणार यावर अद्याप कोणत्याही अधिकृत हालचाली होताना दिसत नाही. त्यामुळेच अद्यापही हर्षवर्धन दादा नाॉटरिचेबलच आहे. तर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय गनिमी कावे समोर येण्याची शक्यताही नाकारता आहे.
विजयराज शिंदेंची हिंमत आणि लायकी दोन्हीही महायुतीतील घटक पक्ष शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार संजय गायकवाड यांनी काढली.
तर हिम्मत असेल तर अर्ज कायम ठेवून दाखवावाच असा उपरोधिक टोलाही शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी लगावला.
मा.आमदार हर्षवर्धन सपकाळ जयश्रीताई शेळके व व इतर छोटे मोठे संभाव्य उमेदवार 4 एप्रिल ला समोर येऊ शकता. तूपकर-शेळके-खेडेकर तर या त्रिशंकू टीएसके सोबत विजयराज शिंदे तेवढ्याच ताकतीचे पैलवान त्यांच्या पवेलियन मध्ये दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विजयराज शिंदे आणि प्रतापगडाचे जुने ऋणानुबंध परंतु त्यामध्ये कभी खुशी कभी गम असाच सर्व संवाद. राजकारणात संभाव्य प्रतिस्पर्धी निर्माण न होऊ देण्याच्या राजकीय खेळीतून निर्माण झालेले वैमनष्माचे हे ऋणानुबंध अद्यापही कायमच आहे. तर आमदार संजय गायकवाड यांनी माजी मंत्री संजय कुटेंना बुलढाण्यात पाय ठेवून दाखविण्याचे खुले आव्हान केले होते. तर तेवढ्याच ताकदीने आमदार संजय कुटेंनी ते स्वीकारलेही होते. परंतु त्यानंतर मनोमिलन हि झाले. अशा असंख्य आव्हान आणि धमक्यांच्या राजकारणात, समाजकारण बुलढाणा जिल्हा आता अग्रेसर होतांना दिसत आहे.त्यामध्ये जिल्हासह राज्यातील देशातील भल्या भल्यांना घाम फोडणारे आवाहन बुलढाण्यातूनच. राष्ट्रमाता माॅ. जिजाऊंचे जन्म ठिकाण. लोणार सरोवर. अवलिया संत गजानन महाराज, सैलानी बाबा, जाळीचादेव, निंबामाता, पैनगंगा उगम,सातपुडा पर्वतरांगा, यामुळे जिल्ह्याला श्रद्धेच दैवत विदर्भाची पंढरी म्हटल्या जाते. बुलढाणा अर्बनच्या सहकारातून विणलेल्या जाळ्यामुळे बुलढाण्याचं नाव साता समुद्र पार गेले.
परंतु मागील पाच वर्षापासून वेगवेगळ्या वक्तव्यामुळे घटनांमुळे बुलढाण्याचं नाव महाराष्ट्रात वाजतय यात दुमत नाही. तरीही अद्याप सुसंस्कृत मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा ही ओळख आहेच. सुप्रसिद्ध अशी ओळख पुसल्या जाणार नाही कृप्रसिद्धीची झालंर जिल्ह्याला लागणार नाही.एवढा समजदारपणा प्रत्येक राज्यकर्त्याने लोकप्रतिनिधींनी घेतला तर बुलढाणा जिल्ह्याचा नावलौकिक जो आहे तो अबाधित राहिला. तरी भरपूर झाले.
हा सविस्तर चर्चेचा विषय आहे. येणाऱ्या काळात त्यावरही प्रकाश झोत पडेलच.
सद्यस्थितीत राजकारणात कूणीही कोणाचा मित्र किंवा शत्रूही नसतो.परंतु राजेंचे हे हाडवैर राजकारणाचे की या व्यतिरिक्त ..? राजेंची तलवार म्यान होते की लढण्यासाठी सज्ज होते. हेही अद्याप गुलदस्त्यातच आहे. वरिष्ठांचे आदेश,वैयक्तिक तडजोडीची चर्चा नंतर निर्णय..?
अर्ज भरण्याचे फायदे आणि तोटे वैयक्तिक असले तरी त्यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचा भंग तर होत नाही न.! आपल्यामुळे इतर उमेदवारांना, नागरिकांना, प्रशासनाला नाहक त्रास सहन करावा लागत नाही न..! याची जाणीवही अर्ज भरण्याची नौटंकी करणाऱ्या आदर्श लोकप्रतिनिधींना नसणे. हे जिल्ह्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
पुढील भागात वास्तविकतेवर आधारित जिल्ह्यातील राज्यकर्त्यांची, लोकप्रतिनिधींची कार्यपद्धती यावरही विश्लेषणात्मक संवाद साधूया.