Police alert regarding embezzlement funds of Nandura Urban Bank, one more accused arrested!नांदुरा अर्बन बँकेच्या अपहार निधी बाबत पोलीसांची सतर्कता, आणखी एक आरोपीस अटक!

बुलढाणा जिल्हयामध्ये विश्वासहर्ता जपत अनेक वर्षापासून सहकार क्षेत्रामध्ये नावलौकीक कायम असलेल्या नांदुरा अर्बन बँकेचा पारदर्शक कारभार असल्याने जिल्हयासह इतर जिल्हयामध्ये विविध शाखेच्या माध्यमातुन सेवारत असलेल्या नांदुरा येथे असलेल्या मुख्य शाखेमध्ये नुकताच झालेल्या साडेपाच कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणाचा तपास सुरु आहे. या तपास प्रकरणामध्ये आणखी एकास अटक करण्यात आली आहे. या अारोपीकडून 14 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे या अपहार प्रकरणाचा गुंता लवकर सुटण्याचे संकेत मिळत आहेत.

नांदुरा अर्बन बँकेत कार्यरत असलेल्या एका कॉम्प्युटर ऑपरेटर असलेल्या लिपीकाने क्रिकेट सट्टयापायी बँकेच्या खात्यातुन साडेपाच कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम विविध 36 खात्यामध्ये ट्रांसफर करुन अपहार केल्याबाबतची तक्रार बँक चे व्यवस्थापक राजेंद्र कुमार पांडे यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला दि. 28 मार्च रोजी दिली हाेती. या तक्रारीच्या आधारे नांदुरा पोलीसांनी तात्काळ कॉम्प्युटर आॅपरेटर लिपीकास तसेच मुख्य आरोपी असलेल्या प्रतीक शर्मा यास अटक केली. नांदुरा पोलीसांच्या वतीने सुरु असलेला पोलीस तपास आता गुन्हे अन्वेषण शाखा बुलढाणा यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

याच कालावधीत दि. 11 एप्रिल 2024 ला नांदुरा येथील मोहन मधुकर घन यास एलसीबी पथकाच्या वतीने अटक करण्यात आली. दरम्यान बँकेने दिलेल्या तक्रारीवरुन ज्या36 खात्यामध्ये ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे. त्या 36 खात्यांची सविस्तर माहिती नावासह पोलींसाना दिली आहे. यापैकी इतर कोणालाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान नांदुरा शहरात सुरु असलेल्या क्रिकेट सट्ट्यावर हा कर्मचारी साडेपाच कोटी रुपये हरला.

क्रिकेटचा सट्टा जुबेर नामक बुकी चालवित असल्याचे समोर अाले आहे ज्याच्या ज्याच्या खात्यात ही रक्कम टाकली आहे.ही खाते सट्टेबाज किंवा त्यांच्याशी ओळखी असलेल्याची आहेत. तसेच क्रिकेट सट्टेवाल्यानी कोट्यावधी रुपयांची स्थावर मालमत्ता दुसऱ्यांच्या नावावर विकत घेतली असल्याचे समोर आले आहे. या अपहार प्रकरणी ज्यांच्या खात्यामध्ये प्रचंड रक्कम वर्ग करण्यात आली आहे. त्या सर्वांची चौकशी होणे गरजेचे आहे.

तरी नांदुरा अर्बन बॅक अपहार प्रकरणाचा तपास योग्य सुरु असून यातुन 14 लाख रुपये जप्त केले असल्याची माहिती पो.नि. अशोक लांडे, एलसीबी, बुलढाणा यांच्या वतीने देण्यात आली अाहे.