Maratha Roshala begins : मराठा रोशाला प्रारंभ.
कॉर्नर सभा,मेळाव्यांनाही प्रतिसाद अत्यल्प.

तरीही मोदीची गॅरंटी…!

महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ बुलढाण्यात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतापराव जाधव, मंत्री गुलाबराव पाटालांसह सर्वश्री पाच सहा मतदारसंघाचे आजी माजी आमदार यांच्यासह डझनभर नेत्यांची भरगच्च उपस्थितीत होती. यावेळी महायुतीच्या सर्वच नेत्यांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच काम केलं. मेळाव्याला उपस्थितीतांनी प्रत्येकाने बेंबीच्या देठापासून चांगलीच फटकेबाजी केली.
तर मोदींची स्तुती, मोदींची गॅरंटी, मोदींचे कार्य यावरच एकनाथराव लोकसभा रणसंग्रामात व्यक्त होतांना दिसले.
परंतु संपूर्ण मनोगतातून प्रतापरावांच्या कार्याविषयी ते काहीच बोलू शकले नाही.तर मराठा आरक्षणावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.एकीकडे मराठा रोशाला बुलढाणा जिल्ह्यातही प्रारंभ झाल्याची शक्यता आहे. त्यामुळेच उमेदवारांना प्रचारासाठी गाव खेड्यात जाणे ही दुरापास्त होत आहे.तर असे असतांना दस्तुरखुद नेत्यांना शहरातच मंगल कार्यालयात कॉर्नर सभा , मेळावे घेण्यातच धन्यता मानावी लागत आहे.
तूर्तास एवढेच.

✍🏻अँड.सतीशचंद्र रोठे पाटील,
राजकीय विश्लेषक, बुलढाणा.
9637230999