Listen to the signature…give it…..saheb..: ऐक सही …देजीए…..साहेब..
हमारे …घर का चुला बंद है…

● बुलढाणा जिल्हा कोषागार कार्यालयाचा निष्काळजीपणा.

बुलढाणा: गाव पातळी ग्रामपंचायत कार्यालयापासून ते जिह्यातील मुख्य कार्यालयात सुध्दा अंत्यत बेजबाबदार पणा मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
मराठीत एक म्हण आहे नाचता येत नाही म्हणून अंगण वाकडे..अशी परिस्थिती निर्माण आहे.यातच बुलढाणा जिल्हा कोषागार कार्यालयाचा हेकेखोर पणा समोर येत आहे. हा महीना सणासुदी,लग्न सराईचा असतो. त्यामुळे शेतकरी असो या कर्मचारी या महिन्यात अत्यंत परेशान मध्ये असतो यातच कर्मचारी वर्गाची जर वेळेवर पगार न झाल्यास ते खूप संकटात येतात असाच प्रकार बुलढाणा जिल्हा कोषागार कार्यालय मध्ये होताना दिसत आहे. ऑफिसिअल पगार फक्त बुलढाणा कोषागार कार्यालय मधील अधिकाऱ्याच्या सही अभावी पगार न झाल्याचे कारण समोर येत आहे तर कारण कोणते फक्त लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता हे कारण पुढे केल्याचे समजते. पण हे कारण पगार काढण्यासाठी आचारसंहिता ही कोणतीच अडथळा येऊ शकत नाही जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयात आठ एप्रिल पासून पगारबिले पाठवूनही केवळ एक डिजिटल स्वाक्षरी विना सुमारे 12000 कर्मचाऱ्यांचे पगार कोळंबले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याप्रकरणी जिल्हा परिषद कर्मचारी संघटना आणि ग्रामसेवक संघटना आक्रमक झाल्या असून जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाची तक्रार वशिष्ठापर्यंत करण्यात आल्याचे समजते मार्च 2024 चे वेतन 15 एप्रिल उजाळूनही अद्याप पर्यंत न झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे मासिक गणित कोलमले आहे गुढीपाडवा रमजान ईद आंबेडकर जयंती सारखे मोठे सण कर्मचाऱ्यांना पगार विना साजरी करावा लागत आहे. तात्काळ पगार करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा संबंधित संघटनांनी दिलेला आहे.