Last tipper news..! : अखेर टिप्पर खब-यांची खबर ..!
* आठ हजार टिप्परचा हप्ता कुनाचा..!
* हिट अँन्ड रन, वाक ऑन राईट दुर्लक्षितच.!
* निष्काळजीपणे बेभानपणे वाहन चालवून निरअपराध नागरिकांना इजा पोहोचविणे. गंभीर जखमी करणे. मृत्यूस कारणीभूत ठरने.अपघात करून पळ काढणे. या गंभीर घटनेला आळा घालण्यासाठी नुकताच अमेंडमेंट करून तयार झालेला हीट अँन्ड रनचा कायदा जिल्ह्यात कार्यान्वितच नाही. किंवा हिट अँड रनच्या कायद्याची अंमलबजावणी करायला पोलीस प्रशासन का तत्परता दाखवत नाही.! आरोपीला वाचविण्यासाठी की चिरीमिरी घेण्यासाठी या निमित्ताने ही गंभीर बाब समोर आली आहे.
* नुकत्याच घडलेल्या नांदुरा येथील दुर्दैवी घटनेनंतर प्रशासन अलर्ट मोडवर येईल ही आशा कर्तव्यदक्ष जिल्हा प्रशासनाकडून बुलढाणा जिल्हा वासियांना होती. परंतु दुधाची तहान ताकावर भागविण्यासारखा प्रकार म्हणजे अपघात,विना नंबर प्लेटचे वाहन,वाॅक ऑन राईट वर चर्चा झाली. तर काही विना नंबर प्लेट चे टिप्पर जिल्हा प्रशासनाच्या रडारवर आले.परंतू मूळ प्रश्न आणि अवैध धंदे जैसे थेच आहे. अनधिकृत रेती माफीयांच्या विरोधात आज सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील खामगाव व इतर परिसरात कारवाई झाल्याचे समोर येत आहे. महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांची माहिती घेत रेतीमाफीयांना माहीती देणाऱ्या दोन खबऱ्यांची खबर पोलिसांनी काल घेतली. परंतु आठ हजार रुपये टिप्परचा प्रती महिना घेणाऱ्या पोलीस विभागातील दलालांची माहिती पोलिसांना का मिळाली नाही.? कोणत्या तालुक्यात किती टिप्पर चालतात, एका टिप्परचे किती महिना पोलिस,महसूल, आरटीओ आणि इतर विभागाला जातो. यावर अधिकृत आकडेवारीनुसार पुढील विश्लेषणात येईलच. तर छटाकभर कारवाई आणि क्विंटलभर माहीती प्रसिद्धीस देण्याचा प्रशासकीय डाव या निमित्ताने समोर आला.भरधाव वेगाने वाहणाऱ्या टिप्परच्या अपघाताची कारणी मीमांसा प्रशासकीय कागदी घोड्यांचा ससेमिराही समोर आला.हिट अँन्ड रन यावर फक्त चर्चेचे गुऱ्हाळ झाले. तर हिट अँड रन चा कायदा पारित असतांनाही गुन्हे दाखल होत नसल्यामुळे मृतकांच्या नातेवाईक गणगोतामध्ये कर्तव्यदक्ष जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आक्रोश निर्माण झाला आहे.रस्त्यावरील अपघातात पदाचाऱ्यांचे वाढणारे निष्पाप बळी लक्षात घेऊन, यावर उपाययोजनेसाठी आजवर अनेक उपक्रम राबविले आहेत. पूर्वीच्या कायद्यानुसार आपण डाव्या बाजूनेच रस्त्यावर चालल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांची कल्पना न आल्याने अधिक बळी गेले आहेत. हे लक्षात घेऊन रस्त्यावर चालतांना समोरून येणारी वाहने आपल्याला दिसावीत व त्यापासून स्वत:ची सुरक्षा करता यावी यादृष्टीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ‘उजव्या बाजूने चला’, ‘वॉक ऑन राईट’ ही अभिनव मोहिम राज्यभर प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतली आहे.परंतु सदर मोहिमेला बुलढाणा जिल्हा अपवाद आहे. काही प्रमाणात वाक ऑन राईट ही अभिनव मोहीम राबविण्याची तसदी फक्त कागदोपत्री घेतल्याची गंभीर बाब समोर येत आहे.
* केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या रिपोर्ट्सनुसार 2021 मध्ये 4,12,432 रस्ते अपघात झाला आहेत. यामध्ये एक लाख 53 हजार 972 जणांचा मृत्यू झाला आहे. तर वर्षभरात तीन लाख 84 हजार 448 जण रस्ते अपघातात जखमी झाले आहेत. 2020 मध्ये झालेल्या रस्ते अपघाताच्या तुलनेत 2021 मध्ये रस्ते अपघाताची संख्या कमी आहे. त्याशिवाय 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये रस्ते अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांचं प्रमाणही कमी आहे. 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये रस्ते अपघातामध्ये मृत्यूचं प्रमाण 14.8 टक्केंनी कमी आहे. तर रस्ते अपघाताचं प्रमाण 8.1 टक्केंनी कमी आहे. परंतु त्यानंतर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) जारी केलेल्या अहवालानुसार,2022 या वर्षात भारतात एकूण 4,61,312 रस्ते अपघातांची नोंद झाली. या अपघातांमध्ये 1,68,491 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर या रस्ते अपघातांमध्ये सुमारे 4.45 लाख लोक जखमी झाले आहेत. ‘भारतातील रस्ते अपघात – 2022’ शीर्षकाच्या अहवालात 2021 च्या तुलनेत भारतात अपघातांची संख्या सुमारे 12 टक्क्यांनी वाढली आहे. तर रस्ते अपघातातील मृत्यूची संख्या 9.4 टक्क्यांनी वाढली आहे. 2022 मध्ये जखमी लोकांच्या संख्येत 15.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पोलिसांद्वारे सामायिक केलेल्या माहितीच्या आधारे MORTH रस्ते अपघातांवरील हा वार्षिक अहवाल तयार करण्यात आला आहे. ही प्रशासकीय परंतु गंभीर आकडेवारी या निमित्ताने समोर येत आहे. तेंव्हापासून हिट अँड रन चा कायदा अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे.
* निरपराध नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत प्रत्येकाला शासन व्हावे.हाच तूर्त मृतक परिवारातील सदस्यांचा आणि नागरीकांचा आर्त टाहो आहे.
* पुढील विश्लेषणात
* जिल्ह्यातील तालुका निहाय टिप्पर किती आणि अधिकृत आणि अनधिकृत दर काय.
* निपक्ष स्वच्छ निवडणूक प्रक्रियेतील 10.3% मतदान कूणाच्या पथ्यावर.
* ✍🏻 अँड.सतीशचंद्र रोठे पाटील, राजकीय विश्लेषक, राजुर बुलढाणा 96 37 230 999