It is because of Savitribai that I could stand for kirtana today - famous kirtan artist Habhap Shivlilatai Patil: सावित्रीबाईंच्या त्यामुळेच मी आज कीर्तनासाठी उभे राहू शकले-सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप शिवलीलाताई पाटील
मलकापूर : महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक सुधारणामुळेच खऱ्या अर्थाने आज महिलांना शिक्षणाच्या विविध संधी निर्माण झाल्या आहेत. व त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात महिलांनी प्रगती केली. महिलांना समाजात सन्मानाचे स्थान प्राप्त होणे ही महात्मा फुले यांच्याच संघर्षाची फलश्रुती आहे. त्यांच्या त्यागाममुळेच आज मी कीर्तनासाठी उभी असल्याचे मत हभप शिवलीलाताई पाटील यांनी कीर्तनातून व्यक्त केले.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सार्वजनिक जयंती उत्सव समारंभ प्रसंगी द्वारे आयोजित समाज प्रबोधन पर कीर्तनातून महात्मा ज्योतिराव फुलेंच्या कार्यावर प्रकाश टातांना त्या बोलत होत्या.
बहुजन उद्धारक सेवा समिती द्वारा येथील शहीद संजयसिंह राजपूत स्मारक परिसरात महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समारोह सर्वसमावेशक पद्धतीने संपन्न झाला. यावेळी सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप शिवलीलाताई पाटील यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सोबतच बहुजन उद्धारक सेवा समितीच्या महिला प्रतिनिधीनी हभप शिवलीलाताई पाटील यांना सावित्रीबाई व ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमा, जिजाऊंची प्रतिमा व शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. आपल्या कीर्तनातून हभप शिवलीलाताई यांनी वारकरी संप्रदायाचे समाज प्रबोधनाचे कार्य आणि महात्मा फुलेंचे शैक्षणिक सामाजिक व अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य यांची सांगड घालून प्रबोधनपर केले.
याप्रसंगी विविध स्तरातील ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, राजकीय पुढारी तथा महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बहुजन उद्धारक सेवा समितीचे संतोष बोंबटकर, प्रा डॉ नितीन भुजबळ, श्याम वानखेडे, संजय उमाळे, किशोर राऊत, मंगेश सातव, दिपक बावस्कर, अतुल सपकाळ, वैभव भोसले, निरज येवतकर, सुपेश बोंबटकर आदींनी परिश्रम घेतले.
* सर्वसमावेशक पद्धतीने महात्मा फुले जयंती उत्सव संपन्न.
* समाजातील सर्व जाती-धर्मातील नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थिती पहायला मिळाली. कार्यक्रमाचे संचालन प्रा डॉ नितीन भुजबळ यांनी तर आभार प्रदर्शन दिपक बावस्कर यांनी केले.
याप्रसंगी बहुजन उद्धारक सेवा समिती द्वारे रामकृष्ण चोपडे यांना समाजभूषण तर नागपूर उच्च न्यायालयाचे एड. मिरा क्षिरसागर व एड. प्रदिप क्षीरसागर यांना सत्यशोधक फुले दांपत्य सामाजिक कार्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.