If Muslims enter politics, who will collect the scrap..!
Homecoming of kings and patals..! मुस्लिम राजकारणात आले तर भंगार कोण जमा करेल..!
राजे आणि पाटलांची घर वापसी..!
बुलडाणा ः एकेकाळी नगरपरिषद, ग्रामपंचायत च्या निवडणुकीत उमेदवारांचे पेव फुटायचे. परंतु हवशे,गवशे, नवशे म्हणून प्रस्थापित दिग्गज उमेदवार त्यांची टिंग्गल उडवायचे. एकदा तर बुलढाण्याचे प्रस्थापित दिग्गज राजकारणी असलेले माजी आमदार धृर्पतराव सावळे यांनी दिलेले स्टेटमेंट आजही बुलढाणा जिल्ह्यातला मुस्लिम समाज विसरू शकला नाही. ” मुस्लिम समाज जर राजकारणात आला तर भंगार कोण जमा करेल..! ” हे वाक्य आजही बुलडाणा जिल्हा वासियांच्या प्रामुख्याने मुस्लिम समाजाच्या जीव्हारी लागलेले आहे. परंतु एका स्टेटमेंट मुळे धुर्त धुर्पतरावांचेही राजकीय स्टेटस संपले. दुर्दैवाने मुस्लिम समाजाला उमेदवारी न मिळाल्यामुळे तो रोश दाखविण्याची संधी विधानसभेत, लोकसभेत मिळाली नाही. यावेळेस तो वचपा पुन्हा निघू शकतो..! जनतेतील नगराध्यक्षांच्या वेळी मो.सज्जाद यांना त्या रोषामूळे संधी मिळाली. तर तत्कालीन हिंदू नेत्यांनी खान पाहिजे की बाण असा जहरी प्रचार केल्यावरही सुज्ञ सामाजिक सलोखा जोपासणाऱ्या बुलढाणेकरांनी बनाला नाकारून खानाला जवळ केले. या इतिहासाची पुनरावृत्ती झाल्यास आश्चर्य नाहीच. तेव्हाही स्वाभिमानी हिंदू दलित आणि मुस्लिम समाजाने आपली सर्वधर्मसमभावाची ताकद दाखवलीच होती. तर सद्यस्थितीत सर्वसामान्य हवशेगवशे फक्त अर्जदार उमेदवार यांचीही मन धरणी सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य उमेदवारी अर्जदाराला सुद्धा एक सन्मानाचे स्थान मिळत आहे. तर हीच प्रक्रिया खऱ्या अर्थाने लोकशाहीला सुदृढ करत असते. तर मागील लोकसभा निवडणुकीपर्यंत पाच-दहा उमेदवारी अर्ज विधानसभा,लोकसभेला दाखल होत होते.
परंतु यावेळेस लोकसभेला पाच,दहा,पंधरा नाव्हे तर चक्क 29 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असणारा उमेदवारी अर्ज म्हनजे सामान्य जनतेचा रोषच न..! सोबतीला मराठा क्रांती मोर्चाच्या पडसादाची झालर आहेच.
बुलढाणा लोकसभा रणसंग्रामात चोवीस उमेदवारांचे अर्ज
आठ एप्रिल ला दुपारी तीन वाजेपर्यंत सहा ते सात अर्जदारांसोबत दोन दिग्गज परतीच्या वाटेवर असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामध्ये नट कसण्याच्या अगोदरच राजेंचा पाना निकामी होण्याची शक्यता..! तरी सामाजिक मतांचे ध्रुवीकरण पाहता सप्तरंगी लढतीचे संकेत कधी नव्हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात होणार असल्याची राजकीय जाणकारांची प्रतिक्रिया आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते ज्ञानेश्वर दादा पाटील उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दिल्लीतील भेटीला आणि चर्चेला उधाण आले आहे. अद्यापही ते रणसंग्रामात उतरतील किंवा नाही यावर प्रश्नार्थक चिन्ह आहेच. राजकीय वाटाघाटी नंतर ज्ञानेश्वर पाटीलही खामगाव विधानसभेच्या वाटेवर जातील असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहे. असे असतांना नुकतीच डॉ.राजेंद्र शिंगणे आणि बुलढाणा वन मिशनचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांच्यातील गोपनीय चर्चा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचबरोबर रविकांत तुपकर आणि आझाद हिंदची चळवळीतील जवळीकही सर्वश्रुत आहे. परंतु राजकारणात जर तरला काहीच महत्त्व नसते. शेवटी प्रत्येकाला आपली अस्मिता आणि आपल्या अस्तित्वासाठी लढायची वेळ आल्यास ते सर्वस्व पणाला लावतातच.
तर वर्तमान परिस्थितीत 8 एप्रिलला उमेदवारी अर्ज माघार घेतलेल्या फक्त अर्जंदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठीही दिग्गज उमेदवार धडपडतांना दिसताय .कधीकाळी आपल्या तोऱ्यात चालणारे जिल्ह्यातील नेते आज सर्वसामान्य अर्ज दाखल करणाऱ्या नागरिकांच्या धास्तीने हतबल होतांना दिसत आहे.
शक्ती प्रदर्शन
प्रतापराव जाधव, नरुभाऊ खेडेकर, संदीप शेळके, रविकांत तुपकर ,यांनी शक्ती प्रदर्शनासाठी लागणारी ” सर्वकश ” सर्वोत्तम तन-मन-धनाने शक्ती पणाला लावली. तरीही शक्ती प्रदर्शनात सामील झालेल्या” मूल्यवान ” शेतकरी, शेतमजूर, नागरिकांचे मत मिळेलच याची शाश्वती उमेदवारांना नाही. कारण आपण जाणताच. सद्यस्थितीत ग्रामीण भागात शेतात काम नाही आणि दामही नाही त्यामुळे लोकशाहीचा लोकोत्सव साजरा होत आहे.
तर सामाजिक मतांच्या ध्रुवीकरणामध्ये चिल्लरच्या माध्यमातून देशात पोहोचलेले मुस्लिम समाजाचे उमेदवार असलम शहा यांनाही चिल्लर किंवा भंगार वेचणारे लेखून चालणार नाही. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली भूमिका महत्वपूर्ण ठरत आहे.अद्यापही मराठा आरक्षणा सोबत असल्याची भूमिका आजी-माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधींनी घेतली नाही. बहुजनांच्या मतांवर डोळा ठेवणारे काही मातब्बर राजकारणी जाणीवपूर्वक मराठा आरक्षण विषयाला बगल देण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा आरक्षण हा मुद्दा फक्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र पुरता असून त्याचा प्रभाव बुलढाणा लोकसभा मतदारसंघात पडणार नाही अशी चर्चा दबक्या आवाजात करनारे दस्तूरखूद उमेदवार आहेत. परंतु सर्वसामान्य मराठा नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.प्रसंगी नेत्यांच्या सभांना आणि प्रचाराला मोठे नेते येताना कचरत आहे. हे वास्तवही नाकारून चालणार नाही. मराठा आरक्षण समितीचे तत्कालीन अध्यक्ष अशोकराव चव्हाण, पंकजाताई मुंडे, महादेवराव जानकर यांना मराठा रोशाला सामोरे जावे लागलेच. तर त्याचे पडसाद देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतही उमटत आहेत. मोठ्या नेत्यांची सभा सुरू झाल्यानंतर मंडप खाली करण्याची रणनीती मराठा योद्धांनी आखली. तर मराठा आरक्षण आणि मराठा क्रांती मोर्चाला विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींना जमीन दोस्त करण्याचा गनिमी कावा विदर्भातील यूवा मराठा संयोजकांच्या बैठकीतून आखल्या जात आहे. मराठ्यांच्या स्वाभिमानासाठी अस्मितेसाठी कधी नव्हे आज मराठा रणनीतीने लढतोय.मराठा क्रांती मोर्चा सोबत मराठा स्वराज्य, युवा मराठा, कुणबी मराठा, मराठा पाटील अशा विविध मराठ्यांच्या सामाजिक संघटना एकवटले आहेत. तर एकसंघ होऊन पुढाकार घेत असल्याचेही विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे काही दिग्गज उमेदवारांची गोची होत आहे. निर्दोष निरअपराध मराठा समाज बांधावरील दाखल झालेले गुन्हे .महिलांवर झालेला अमानुष लाठी हल्ला, अश्रृधारा आणि गोळीबार. मराठा समाजाच्या जीव्हारी लागलेलाच आहे. असे असतांना मनोज जरांगे पाटलांवर एसआयटी लावण्याची हिंम्मत सरकारने केल्यामुळे फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनाही मराठा रोशाला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे. मराठा रोशामुळेच अपकी बार 400 पारला ब्रेक लागण्याची राजकीय विश्लेषकांची प्रतिक्रिया बोलकी आहे.
अद्याप ‘ तेरी भी चुप, मेरी भी चुप ‘या पद्धतीने उमेदवार, प्रस्थापित राज्यकर्ते जाणीवपूर्वक मराठा रोशाला कमी लेखून दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशातच मनोज जरांगे पाटील कोणत्या वेळी काय भूमिका जाहीर करतील याचा अंदाज तर भल्या भल्यांनाही बांधता येणार नाही.
तूर्तास एवढेच.
अँड सतीशचंद्र रोठे
राजकीय विश्लेषक बुलढाणा.