What is sown will grow..! Infinite talkative Baralti Barad.! :जे पेरले तेच उगवणार..! अनंत वाचाळ बरळती बरड.!
मोदी शहांच्या सरकार पुढे भल्याभल्यांनी नाग्या टाकल्या. काँग्रेस व घटक पक्षांना जे आजपर्यंत जमलं नाही ते या सरकारने करून दाखवलेच. ईडी,सीबीआय, सुरक्षा यंत्रणा मोदी सरकारची कवच कुंडले म्हणून जनहितार्थ कार्य करीत असल्याचा अनुभव महाराष्ट्रासह देशाने घेतला..! सरकारी नोकरी, खाजगीकरण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाई, शिक्षण ,आरोग्य यावर अद्यापही प्रस्थापित राज्यकर्ते बोलायला तयार नाहीत.तेच दिल्लीतील लोन आता गल्लीतही पोहोचत आहे. जे पेरले तेच उगवतं त्याच वृत्ती प्रमाणे आता विदर्भातही मोदी शहांच्या सरकारची कार्यपद्धती जोर धरू पाहत आहे.
बीजेपी चे बुलढाणा लोकसभा संपर्कप्रमुख मा.आ. विजयराज शिंदे यांची चोही बाजूने कोंडी करण्याची राजकीय खेळी गुलाबराव पाटील,आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यातून खेळल्या गेली.
तर राजेंना त्यांच्यात चक्रव्यूहात अडकवून नामोहरम करण्याचा प्रयास यशस्वीही झाला.शिंदेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला तर पक्षातून हकालपट्टी.! पर्यायाने बुलढाणा विधानसभेचा बालेकिल्लाही अभेद्यच. त्यामुळेच राजेंना रणसंग्रामात ओढण्याचे मनसुबे होतेच परंतु राजेही मातब्बर राजकारणीच. लांब उडी घेण्यासाठी दोन पावलं मागे घेणे याला पराभव म्हणता येणार नाही. तोच किस्सा काँग्रेसचे दिग्गज नेते ज्ञानेश्वर दादा पाटील सुद्धा गिरवतील यात दुमत नाही. राजेंचा पाना रणसंग्रामात उतरण्या अगोदरच प्रतापरावांचा बान तोडण्यात यशस्वी ठरला.
अबकी बार 400 पार जाण्यासाठी मोदी शहांच्या आदेशाचे उल्लंघन करणे राजेंना राजकीय संन्यासासाठी कारणीभूत ठरू शकते. ही दूरदृष्टी ठेवूनच गुलाबराव आणि गायकवाड यांची खेळी राजकीय तलपटलावर शिंदेंना गारद करण्यात यशस्वी ठरली.
राजकीय रणसंग्रामत एकमेकांवर कुरघोडी करून पुढे जाण्याची महत्त्वकांक्षा म्हणजे युद्धच आहे. परंतु या कुरघोड्यांमध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नाचा विसर लोकप्रतिनिधींना पडत आहे. हे लोकतंत्र सुद्धा राज सत्तेसाठी महत्त्वपूर्ण आहे.
तर विदर्भातील सर्वात चुरशीची लढत अमरावती येथील राणा आणि बच्चू भाऊंची आहे . ही लढत वैयक्तिक विरोधक म्हणून लढल्या जात आहे. त्यामध्ये विकास कामे आणि पक्षाचा जाहीरनामा बाजूला पडला आहे. वाशिम यवतमाळ लोकसभेत हीच परिस्थिती आहे .भावनाताईंना थांबवून मनधरणी करण्यासाठी एकनाथ शिंदेंना अपार संयमाने चालावे लागत आहे. अकोला लोकसभेतील धक्का तंत्राचे पडसाद आता अमरावतीतही पडत आहे. वंचित चे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या धक्का तंत्रातून मोठी राजकीय खेळी खेळली. तोच प्रयास प्रहार चे बच्चुभाऊ कडून अकोल्यात होत आहे त्यामध्ये नवल ते कसले..?
परंतु दिग्गज राज्यकर्त्यांकडून राजतंत्राबरोबर लोकतंत्राचा मानस लोकशाहीच्या सर्वात मोठ्या लोकसभा रणसंग्रामात सामान्यांना अपेक्षित आहे. बोलायचा भात बोलायची कडी करून आता निवडणुका जिंकणे शक्य नाही. कारण सामान्य नागरिक याला फार विटला आहे. गुळगुळीत सोपासकरांचे शब्द वापरून सामान्यांच्या आयुष्याची राख रांगोळी करण्यापेक्षा सत्यावर आधारित दोन कटू शब्द असले तरी जनता पचवती. परंतु त्यासाठी विकास कामांची जोड, कार्यकर्त्यांचा, नागरिकांचा विश्वास महत्वपूर्ण घटक आहे. जनहितार्थ विकास कामांच्या जाहीरनाम्यापासून सामान्यांना दिशाभूल करण्याचे वाचाळ तंत्र आता नागरिकांच्या जिव्हारी लागत आहे. भीक नको पण कुत्रे आवर ही म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे.महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, विकास यावर देशातील सर्वात मोठी लोकसभेची निवडणूक होतांना यापूर्वी आपण अनुभवली. परंतु आता अनंत वाचाळ बरळती बरळ या पद्धतीने दिशाहीन राज्यकर्त्यांची तुफान फटकेबाजी सामान्यांच्या हिताची तरी नक्कीच नाही.
देशातील राज्यातील प्रमुख घटक पक्ष आणि विरोधी पक्ष यांचे कपड्यांसारखे पक्ष बदलण्याची प्रवृत्ती. घरवापसी आणि पक्ष बदलीची दैनंदिन उदाहरणे तत्वनिष्ठा आणि विश्वासाला तळा देणारीच. स्वखर्चातून उरलेला शासनाचा निधी महिन्याचा पगार सुद्धा परत करणारे लोकप्रतिनिधी याच भारत देशाने अनुभवले. वर्तमान परिस्थितीतील लोकप्रतिनिधी, पक्ष सुद्धा हाच देश अनुभवतोय. यांची तुलना करणेही कर्तुत्वान लोकप्रतिनिधीच्या कर्तुत्वाला काळीमा फासणासारखे आहे. दोन दशकापूर्वी संपूर्ण ह्यात पक्षात निघून जायची तरीसुद्धा साध नगरपालिकेचे तिकीट भेटायचं नाही. त्याही परिस्थितीत पक्षनिष्ठा आणि ध्येयनिष्ठा डगमगायची नाही. तो काळ आता पुन्हा परिवर्तित होईल..!
त्यामुळेच सर्वसामान्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या, नौटंकी बनावटपणा न करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांवर आता जनतेचा विश्वास बसत आहे.त्यामुळेच कधी नव्हे छोट्या राजकीय घटक पक्षांना,रजिस्टर अनरेकग्नाईज पक्ष,संघटना आणि अपक्षांना सामान्यांनी जवळ करायला सुरुवात केली आहे. हे खऱ्या अर्थाने पोषक लोकशाहीच ज्वलंत उदाहरणच म्हणावे लागेल. परंतु तरीही हम करे सो कायदा या वृत्तीला आता महाराष्ट्रात तरी तडा जातांना दिसत आहे. मनोज जरांगे पाटलांची भूमिका, मराठ्यांमधील आक्रोश, मराठ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे बेताल वक्तव्य बूमरँग होण्याची वेळ प्रस्थापितांवर आली आहे. सामान्य नागरिकांची होणारी हेळसांड नागरिकांच्या हृदयात खदखदत आहे. तरीही जनसामान्यांच्या असंतोषाला, आक्रोशाला शृल्लक समजण्याची मोठी चूक प्रस्थापित राजकीय प्रतिनिधी करतांना दिसत आहे. असंतोषाची ठिणगी पडणार नाही. श्रीलंकेचीवृत्ती भारतात येणार नाही.
समजदार को इशारा काफी है अजूनही राज्यकर्ते स्वतःला सांगू शकता सामान्यांना आपलंसं करू शकता वेळ आहे. तूर्तास एवढेच.
अँड सतीशचंद्र रोठे
राजकीय विश्लेषक बुलढाणा.