Four kilos of ganja seized in Pusad area: पुसद परिसरात चार किलो गांजा जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

यवतमाळ : पोलीस ठाणे पुसद ग्रामीण हददीतील 4 किलो गांजा (अंमली पदार्थ )दिनाक 07/04/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पुसद परिसरात असतांना पथकास मुखबीर कडुन खात्रीलायर माहीती मिळाली कि, मौजे कान्हा येथील इसम नामे पंकज विष्णु कटारे हा गांजा नामक अंमली पदार्थ विक्री करण्याचे दृष्टीने बाळगू असून तो विक्री करीता बाहेर घेवून जाणार आहे अशा प्राप्त माहिती वरुन पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करुन पुसद: माहूर रोड वरील कान्हा फाटा, सापळा कारवाई करुन इसम नामे पंकज विष्णू कटारे वय 21 वर्षे, रा. कान्हा ता. महागांव यास ताब्या घेवून त्याचे ताब्यातुन 4 किलो गांजा व एक मोबाईल फोन असा एकुण किमत 1,00,000/- रु चा मुददेमाल हस्तगत करुन जए केला. वरुन आरोपी पंकज विष्णू कटारे वय 21 वर्षे, रा. कान्हा ता. महागांव याचे विरुध्द NDPS Act अन्वये पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून मुद्देमाल व आरोपी यास पुढील तपासकामी पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे
स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ अवैध धंदे, अवैध अग्निशस्त्र व घातक शस्त्र बाळगणारे गुन्हेगार, संपत्ती विषयक गुन्हे उघड करणे तसेच अंमली पदार्थ तस्करी, अवैध जनावर तस्करी, अवैध रेती तस्करी व अशा स्वरुपाचे गैरकायदेशीर धंदयाचे समुट उच्चाटन करण्यास कटिबध्द असुन जनतेला आवाहन करण्यात येते की, आपले परिसरात सुरु असलेल्या अशा स्वरुपाचे अर्थ बंदयासंबंधीत माहिती असल्यास सदरची माहिती जनतेने पोलीसांना पुरावाबी व पोलीसांना सहकार्य करावे.सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ,पियु जगताप, मा. सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांचे मार्गदर्शनात, आधारसिग सोनुने पो.नि. स्था.गु.शा., गोपाळ उंबरकर पो.नि. पो.स्टे. पुसद ग्रामीण, सपोनि गजानन गजभारे, पोउपनि शरद लोहकरे, चापोउर्पा रेवण जागृत, चापोउपनि रविंद्र श्रीरामे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा/ कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.