First marriage democracy then ours : आधी लगन लोकशाहीचे नंतर आमचे
-मेहकर विधानसभा मतदार संघात ३ नवरदेवांनी केले मतदान
मेहकर:- (गणेश राऊत ) [ विशेष बातमी ]
आधी लगन लोकशाहीचे नंतर आमचे असे म्हणत बोहल्यावर चढ़ण्यापूर्वी मेहकर मतदार संघातील विविध बूथवर ३ नवरदेवांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे
या बाबत अधिक माहिती नुसार आज २६ एप्रिल रोजी बुलढाणा लोकसभेसाठी मतदान होत असून लग्नाची तिथ दाट असून आज खुप लग्न आहेत ज्यांच आज लग्न आहे अश्या नवरदेवांनी बोहल्यावर चढ़ण्याअगोदर आपल्या मतदानाचा हक्क बजावून अगोदर लोकशाहीचे लग्न लाऊन नंतर ते स्वतःचे लग्न लावनार आहेत मेहकर तालुक्यातील उकळी येथील गणेश भागवत सोनुने या नवरदेवाने आपला मतदानाचा हक्क बजावला व नंतर ते रवाना झाले त्यानंतर उकळी येथीलच शुभम केदारनाथ पातळे या नवरदेवानेही लग्न लावण्यासाठी रवाना होण्याअगोदर आपले कर्त्यव्य बजावत मतदान केले तसेच लोणार तालुक्यातील किन्ही येथील नवरदेव वैभव प्रकाश कायंदे याने ही लग्नाअगोदर आपला हक्क बजावत मतदान केले