सगे सोयरेंवर महायुती महाआघाडीचे आजही मौन.
एकनाथराव शिंदेच्या सभेतून मराठ्यांचा काढता पाय.!
शेगावतून धर्मवीरांवर पलटवार ..!
प्रचाराच्या तोफांची सलामी बंद झाली.आरोप,प्रत्यारोप आणि चिखल फेकीत कालचाही दिवस गेला.आज फक्त एक दिवस हातात आहे. अद्याप एकाही सेक्युलर किंवा हिंदुत्ववादी उमेदवाराने मराठा आरक्षण, सगेसोयरे, मराठा भगिनींवरील लाठी हल्ला,सीएए , एनआरसीवर भूमिका ठामपणे मांडायला तयार नाही. बहुरंगी लढतीचे संकेत जरी असले. तरी हिंदू आणि दलितांचे गठ्ठा वोटिंग समप्रमाणात पाच सहा ठिकाणी विभाजित होत आहे. तर सर्वसामान्य मतदार मुस्लिमांचे गठ्ठा मते घेऊन,मुस्लिम समाजाचा उमेदवार आघाडीवर असल्याचे अहवाल समोर येत आहे.
महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ सलग दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आलेल्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित झाला होता. परंतु मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे प्रमुख मनोगत सुरू होता बरोबर मराठा समाज बांधवांनी सभा खाली करायला सुरुवात केली. त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या स्थितीत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तरी यापूर्वीही बऱ्याचश्या गावात महायुती महाआघाडीच्या उमेदवारांना मराठा बांधवांनी चलेजाव च्या घोषणा देत गावाबाहेर सन्मानानेच काढले आहे.? त्यामुळे महायुती महाआघाडीच्या उमेदवारांनी प्रत्यक्ष गावात जाण्याची पुन्हा हिम्मतच केली नाही. रॅली आणि सभा घेऊनच प्रचाराच्या रणधुमाळीत त्यांनी आघाडी घेण्याचा प्रयास केला. परंतु रॅली आणि सभा घेण्यासाठी बेरोजगार मतदारांना सुद्धा रोजगार देऊन सभा रॅलीसाठी बोलवावे लागत आहे. पाचशे रुपयांपासून बाराशे रुपये पर्यंत मुकरदम आणि मजूर मतदार कार्यकर्त्यांचे दर ठरले आहे. काही ठिकाणी सभा झाल्यानंतर मुकरदम आणि आलेले रोजकरी शेतकरी शेतमजूर यांच्यामध्ये सभास्थळीच वादविवाद झाल्याच्या घटनेचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे. तर
महाविकास आघाडीच्या सभेतही बिघाडी समोर आली. उद्धव ठाकरे,मुकुल वासनिक यांच्या सभेनंतर माजी आमदार दिलीप सानंदा आणि तेजेंद्रसिंग यांच्यामध्ये सभास्थळी फ्री स्टाईल हाणामारी सुद्धा झाली. धर्मवीरांनी शेतकरी नेत्यावर पत्रकार परिषदेत काही कागदी व प्रत्यक्ष दर्शनी पुराव्यांसह हल्लाबोल केला. त्याचे प्रतिउत्तरही शेगावतून दिल्या गेलं. अद्याप प्रतीउत्तरावार धर्मवीरांकडून पलटवार झालेला नाही तो बॉम्ब केव्हाही फुटू शकतो.
कोट्यावधींच्या घरात जाणाऱ्या सभा घेण्याचे सामर्थ्य फक्त गडगंज इमानदारीची कमाई असलेल्या दिग्गज नेत्यांनाच परवडते. शेतकरी नेत्यांसाठी लोकवर्गनी, मंगळसूत्र, चेक नगदी नोट आणि एक ओट अशी दान दक्षिणा जमा होत गेली. दानदक्षिणा जमा करण्याची शक्कलही लढवली.
जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून तीनशे ते पाचशे रुपये झाले आलेले मजूर म्हणजे कार्यकर्ते नसतात मतदान नसतात याची जाणीव सर्वच उमेदवारांना आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. त्याच परिसरातील, गावातील, कार्यकर्ते सभेला असल्याची हुशारकी..! गल्लीबोळ्यातील व्हिडिओ काढून प्रचंड गर्दी असल्याची बतावणी.! फाटक्या कार्यकर्त्यांनेही आजपर्यंत सभा आणि रॅलीसाठी केलेल्या खर्चाचा लेखाजोखा जमा झालेल्या दक्षिणेपेक्षा चांगलाच मोठा आहे. जिल्ह्यातल्या एकाच उमेदवाराला देवेंद्र फडणवीस यांच्या निधीमधूनही मोठा निधी आल्याची विश्वसनीय माहिती आहे. मराठा समाज बांधवांनी आणि मुस्लिम समाज बांधवांनी महायुती, महाआघाडीच्या उमेदवारांवर टाकलेला जाहीर बहिष्कार. गावागावातून एक मराठा लाख मराठा चले जाओच्या घोषणांनी नामुष्कीला सामोरे गेलेले महायुती महाआघाडीचे दोन्ही उमेदवार आहेत. तर असंख्य गावात निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे दुर्दैवी चित्रही आहे. तर काफीर नरेंद्र खेडेकर यांच्यापासून मुस्लिम बांधवांनी पाठ फिरवली आहे.खऱ्या अर्थाने असलम शहांच्या विजयाचे हेच गमक आहे.
मराठवाड्यात प्रथम गनिमी काव्याचा उपयोग करीत सभास्थळावरून काढता पाय घेतला. यावरून मराठा क्रांती मोर्चाची धक महायुती व महाविकास आघाडी घटक पक्षांच्या नेत्यांना सोसावी लागत आहे. तर सद्यस्थितीत अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्त्या मराठा महिला,बांधवांवरील लाठी हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोमायने व्हायरल होत आहे.
तूर्तास एवढेच.
[ उद्याच्या विश्लेषणात उमेदवारांनी
लावलेले दिवे व प्रतिक्रिया.]
अँड.सतीशचंद्र रोठे पाटील,
राजकीय विश्लेषक, बुलढाणा
9637230999