Divyang brother has been deprived of 5 percent of the loan since the last month, so the attempt is to withdraw the funds : दिव्यांग बांधव 5 टक्के निधी पासून वंचित लोनवडी ग्रामपंचायत मागील महिन्या पासून देतो म्हणून निधी डावलण्याचा प्रयत्न
दैनिक विश्वजगत ः अजय टप
मलकापूर:-दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम १०१६ मधील कलम ३७ नुसार शासन निर्णयानुसार व ग्राम विकास विभागाने ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नातील पाच टक्के निधी हा प्रत्येक वर्षात एकदा गावातील दिव्यांग बांधव यांना देण्यात यावे.
मलकापूर:-दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम १०१६ मधील कलम ३७ नुसार शासन निर्णयानुसार व ग्राम विकास विभागाने ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नातील पाच टक्के निधी हा प्रत्येक वर्षात एकदा गावातील दिव्यांग बांधव यांना देण्यात यावे अशा सूचना निर्गमित केलेल्या असून सुद्धा लोनवडी ग्रामपंचायत वतीने गावातील दिव्यांग बांधव यांना वर्ष उलटूनही ३ महिने वर झाले असून सुद्धा दिव्यांग बांधव यांना सांगतात की मागील महिन्यापासून सांगत आले की निधी हा २६ जानेवारीला देण्यात येईल,
मग मार्च नंतर देतो,दोन दिवसात देतो असे सांगून दिव्यांग यांच्याशी खेळ खेळत असून ५ टक्के निधी ही डावलण्याचा पर्यंत करत आहे ग्रामपंचायत सरपंचा यांना निधी का देत नाही विचारल्यास तर आम्ही मीटिंग घेऊन सांगतो म्हणतात तर दुसरीकडे त्यांचेच सरपंचा पती म्हणतात आम्ही साहित्य ऑर्डर दिली आहे आली की देतो तर उपसरपंच म्हणतात मी या विषयावर ग्रामपंचायत मध्ये बोललो तर माझा विषयाकडे कोणी लक्ष देत नाही, ग्राम सदस्य यांना विचारल्यास दोन महिन्या पासून सरपंच पती आम्हाला देऊ देऊ सांगत आले यांचा या चुकीचा हलगर्जी पणा मुळे दिव्यांग बांधव ५ टक्के निधी पासून वंचित असून त्यांना त्यांचा हक्काची निधी मिळावी याकडे संबंधित अधिकारी वरिष्ठ यांनी लक्ष देण्याची गरज असून ग्रामपंचायत अपंग यांच्याशी जर असा हे खेळ खेळत आहे तर सामान्य माणसांना पण हे योजना पासून आश्वासन देऊन वंचित ठेवत असतील की काय याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.