Cplus gave the signal of chess match..! : सीप्लसने दिले शटरंगी लढतीचे संकेत..!

दिग्गजांची फक्त हवाच.
गॅस सिलेंडरचे भाव वाधारले.

राजा चुकला तर..सजा जनतेला भोगावीच लागते.

धक्कादाक निकालाचे संकेत समोर आल्याने सामान्यांचाही विश्वास बसेना अशीच काहीशी परिस्थिती बुलढाणा जिल्ह्यातील मतदात्यांची झाली आहे. त्यामुळे दिग्गजांची बत्ती गुल झाली आहे. स्वतःच्या हाताने स्वतःची पाठ थोपटून घेणे आणि माझीच हवा असल्याची वल्गना करणे, जनतेच्या जीव्हारी लागले आहे. मागील वीस वर्षापासून तंतोतंत अहवाल आलेल्या सी प्लस ने बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभेच्या विजयी उमेदवाराचे संकेत दिले आहे. त्यामध्ये प्रतापराव,रविकांत तुपकर, नरेंद्र खेडेकर या तिघांची ही बत्ती गुल झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दिग्गजांची भरभक्कम पाठिंब्याची वल्गना, सभा, रॅल्यांच्या प्रचाराची फुसकी हवा बाहेर आली आहे. पाचशे,हजार रुपयापर्यंत मजुरी देऊन रॅलीआणि सभेचे उच्चांक तोडणे.नौटंकी करून सामांन्यांची दिशाभूल करणे. सामान्यांच्या मूळ प्रश्नांना,ज्वलंत समस्यांना बगल देणे., सामाजिक शांतता आणि धार्मिक द्वेष निर्माण करणे,मराठा आरक्षणाला दुर्लक्षित करण्याची भुल करणे, सीएए, एनआरसीवर ब्र शब्द न बोलणे. मुस्लिमांच्या भावनांना पायदळी तुडवणे., दिग्गज पाच उमेदवारांच्या अंगलट आले आहे.
गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांच्या सभा घेणे. रॅली काढणे, कलाकारांना बोलावणे तरी सर्व मेहनतीवर पाणी फिरण्याचे एकंदरीत चित्र आहे.
उमेदवारांची धनशक्ती, नौटंकी, दादागिरी आणि सर्वसामान्यांची विचार करण्याची शक्ती या मधला दूआ म्हणजे लोकशाही आहे. सर्वसामान्य व्यक्ती कितीही लहान असला तरी त्याला संविधानाने सर्वात मोठा अधिकार दिला आहे. तो म्हणजे मतदानाचा आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या काही चाटुगिरी करणाऱ्या पत्रकारांच्या बातम्या गोदी मीडियातून समोर येत असल्याचे आता सामान्यांनाही कळाले आहे.
त्यामुळे आपल्या सदसद्विवेक बुद्धीला जागृत ठेऊन घेतलेला निर्णय येणारा पिढ्यांचे भविष्य घडवणार आहे. एकंदरीत जिल्ह्यातली समाजातली परिस्थिती प्रत्येकालाच माहीत असते. परंतु तरी आम्ही ग्लॅमरस मीडिया, जाहिरात बाजी, भूलथापा, राजकीय नौटंकी, स्वयं केंद्र स्वार्थासाठी केलेले विदूषकी स्टेटमेंट जिल्ह्याच्या विकासाच्या कोणत्याही दृष्टीने कामाचे नाही. त्यामुळेच पाच वर्षे आमच्यावर गुलाम म्हणून जगण्याची वेळ येते.हीच वेळ आहे.आपल्या अधिकारासाठी हक्कासाठी लढणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची. ज्या उमेदवाराला जनतेची निस्वार्थ भावनेतून सेवा करण्याची इच्छा असेल त्याला प्रथम प्राधान्य दिल्यास गेले पाहिजे. कारण आजच्या परिस्थितीत निस्वार्थ भावना आणि सेवा करण्यासाठी तत्परता या दोनच गोष्टी आपल्यासाठी तरी महत्त्वपूर्ण आहे.
मग त्यासाठी मग मोदींचा, जातीचा,धर्माचा अट्टाहास का..?आपल्यातील समज, गैरसमज क्षणिक असतात. परंतु या वेळेला जर आपण वैयक्तिक स्वार्थासाठी भांडणासाठी जर चांगल्या उमेदवाराला बाजूला सारल तर निश्चितच भविष्यामध्ये आपल्याला त्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागते. आपल्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी,आपली छोटी मोठी कामे करण्यासाठी, आपल्याला कोणत्याच राष्ट्रीय नेत्याची गरज पडत नाही. देशाचे प्रश्न म्हणून काही उमेदवार स्वतःचे कर्तुत्व झाकून मोदींना वोट करायचं सांगताय. परंतु मोदींनी त्यांच्या प्रतिनिधींनी आमच्यासाठी काय केले..? महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, खाजगीकरण, संविधान, बदलण्याची भाषा, धर्मवाद, रेशन कंट्रोलचा गहू देऊन भीक मागायची सवय नक्कीच लावली. आपल्यातला स्वाभिमान गहाण टाकून फुकटचे वायफाय वापरण्याचीही सवय नक्कीच लावली. शिक्षणाचा बट्ट्याबोळ करून पेपर न देता पास होण्याची सवयही त्यांनीच लावली. भरती परीक्षा, आयपीएस, आयएएस परीक्षा, सैनिकी भरती, पोलीस भरती यामधील प्रत्येक वेळी बाहेर आलेला भ्रष्टाचार हे हुकूमशाहीचे लक्षण आहे. तरी आपण सर्व पाहून,सर्व समजून न समजल्या सारखे करत असाल..? तर आपल्यालाही त्याची किंमत मोजावीच लागते. आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांचा संघर्ष आणि विकास दोन्ही देशवासीयांच्या समोर आहेच. आमदार बच्चू कडू, खासदार नवनीत राणा, रवी राणा, आमदार निलेश लंके, यांच्यासारखे असंख्य उदाहरणे आहेत. ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करून दाखवलं. आपणही अशा उमेदवारांना एक संधी द्यावी. लोकसभा निवडणुकीत विकास ध्येयधोरण जाहीरनामा यावर चर्चा होत असते. परंतु कधी नव्हे बुलढाणा जिल्ह्यात या सर्व गोष्टींना बगल देत, फक्त चिखल फेक जिल्हा वासियांनी अनुभवली. तर मुद्द्यांची लढाई केंव्हा गुद्यांवर जाईल हेही सांगता येत नाही. बर त्यांच्या भांडणाचा आणि चिखलफेकीचा जिल्ह्यातल्या एकही नागरिकाला फायदा नाही. त्यामुळे सामान्यांना या नौटंकी बाजीचा वीट आला आहे. मराठा, मुस्लिम, धनगरांच्या आरक्षणा बाबतीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या गेले. जर आजही आपण भावनिक होऊन निर्णय घेत असू तर आपल्याच परिवारातील युवा पिढीच्या जीवनात आपण विष तर कालावत नाही ना. कारण राजा चुकला तर त्याची सजा प्रजेला भोगावीच लागते. धर्मशास्त्र आहे. म्हणून राजा निवडतांना आपण खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. एकदाच चूक झाली,दोनदा चुकी झाली, तर ती सुधारता येते. परंतु एकच चूक पुन्हा पुन्हा करणाऱ्याला मुर्खच म्हणावे लागेल.
मराठा समाज बांधवांवर केलेला अत्याचार, लाठी हल्ला ,सगे सोयरेची उपेक्षा, जरांगे पाटलांवरील एसआयटी, मराठा बांधवावर दाखल झालेले खोटे गुन्हे, अजूनही मराठ्यांच्या जीव्हारी लागले आहेच. त्यामुळेच मराठा समाज बांधवांनी महायुती महाआघाडीच्या उमेदवारांना बहिष्कृत करून पाडण्याचे प्रत्येक जिल्ह्यातील मराठा संयोजकांच्या ग्रुप वर अधिकृत संदेश देऊन आदेशित केले आहे.
तर महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर यांनी मुस्लिमांच्या भावना पायदळी तुडवत धार्मिक द्वेषही निर्माण केला आहे. सेक्युलरिझमचा चेहरा ओढून मुस्लिमांच्या भावनांना पायदळी तुडवणे नरेंद्रांना चांगलेच अंगलट आले. पत्रकार तथा राजकीय विश्लेषकांच्या वतीने विकासाच्या कामावर, मेडिकल कॉलेज, आरोग्य सुविधा, सगे सोयरें, मुस्लिम बांधवांची माफी मागणे, सीएए, एनआरसीवर भूमिका जाहीर करणे, बोलणे, जाहीरनाम्यातील महत्त्वपूर्ण बाबी जनतेसमोर ठेवणे, जिल्ह्यातील समस्या तक्रारीवर प्रश्नांवर आपलं मत मांडने. यावर जिल्हा वासियांच्या प्रतिक्रियांच्या अनुषंगाने सर्व उमेदवारांना आवाहनही केले होते.परंतु एक दोन सोडता इतर एकही मायचालाल या अनुषंगाने अद्याप सुद्धा बोलला नाही. त्यामुळेच बऱ्याचशा गावातून महायुती महाआघाडीच्या उमेदवारांना नामुष्कीला सामोरे जाऊन बाहेर यावे लागेले. जर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा हे लोकप्रतिनिधी ब्र शब्द बोलू शकत नसतील. तर एकदा निवडून दिल्यावर तुमच्या आमच्यासाठी हे नौटंकी उमेदवार कितपत योग्य आहे..? हा निर्णय तुमचा आहे. गडगंज धनशक्ती असलेल्या आणि फाटक्याही उमेदवारांने पेड न्यूज देऊन स्वतःची पाठ थोपटून घेतल्याचा प्रकार सद्यस्थितीत घडत आहे. त्यामुळे आपणही उपरोक्त प्रश्नांची जाण ठेवा. नौटंकी,चॅप्लूसी करणाऱ्या उमेदवारांपासून सावध रहा. जो उमेदवार तुमच्या 24 तास सेवेत उपलब्ध राहू शकतो. तुमच्या हाकेला हाक देऊ शकतो.तोच खरा लोकप्रतिनिधी होण्याच्या लायक आहे. मग तो कोण आहे..? कोणत्या समाजाचा आहे..? कोणत्या पक्षाचा आहे..? हे सर्व आता बाजूला सराव लागेल. तर आणि तरच जिल्ह्याचा विकास होईल. याच एका वचनासह आज आपणास मतदान नव्हे तर मताचा हक्क बजावायला जायचं आहे. एकमेकांवर चिखल फेक करणाऱ्या आणि तुमच्या आमच्या मूळ प्रश्नांना बगल देणाऱ्या बगलबच्चांना आता बाजूला सारता आलं पाहिजे. येणाऱ्या पिढीसाठी, आपल्या परिवारासाठी हा निर्णय चुकला तर पुढील पाच वर्ष नक्कीच गुलाम म्हणून पुढेही जगावच लागेल. जिल्ह्यातील दहशतवाद, जातिवाद,अवैद्य धंदे, महिलांची सुरक्षा, भ्रष्टाचार, मूलभूत नागरिक सुविधा,मराठा आरक्षण यावर आवाज उठवणारा. सर्वधर्मसमभावाची भावना वृद्धिंगत करणारा. उमेदवार आपणास निवडायचा आहे. त्यामुळे मतदान होईपर्यंत कोणत्याही भूलथापांना आपण बळी पडू नका. विकासाला प्राधान्य आणि सुखदुःखात सहभागी होणाऱ्या उमेदवाराला आता मदतीचा हात देऊन या जिल्ह्याचा सालदार बनवायचं आहे. एक भाजीची जुडी घेताना आपण दहा वेळा पाहतो. परंतु पाच वर्षासाठी आपल्या जिल्ह्याचा खासदार,लोकप्रतिनिधी निवडतांना आपण गाफील राहतो. त्यामुळेच येणाऱ्या पिढ्यांच भविष्य संपुष्टात येत आहे. अजूनही वेळ गेली नाही.आपण सर्व सुज्ञ आहात.
महायुती महाआघाडीच्या दोन्ही उमेदवारांना जिल्ह्यातील जनतेने नाकारले आहेत. तसा अहवाल अधिकृत सर्वे करणाऱ्या कंपन्यांनी नुकताच जाहीर केला आहे. त्यामध्ये कोण समोर आहे ,कोण मागे आहे,
हे सर्व आपण जाणता.परंतु तरीही अधिकृत सर्वे करणाऱ्या कंपन्यांचा अहवाल आपणास नाकारून सुद्धा चालणार नाही. त्यानुसार प्रतापराव जाधव पाचव्या क्रमांकावर,तर चौथ्या क्रमांकावर रविकांत तुपकर आहेत.तिसऱ्या क्रमांकावर संदीप शेळके,दुसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर, सहाव्या क्रमांकावर वसंत मगर आहेत.तर प्रथम क्रमांकावर असलम शाह हसन शहा हे पन्नास हजार मताधिक्क्याने निवडून येण्याचे संकेत दिले आहेत.
या निमित्ताने मतांची टक्केवारी वाढवणे प्रत्येक नागरिकाचे भारतीय म्हणून प्रथम कर्तव्य आहे. पेड न्यूज, अफवांना आपण बळी पडणार नाही. एवढीच दक्षता घ्यावी.
तूतास एवढेच..!
_________
✍🏻 अँड.सतीशचंद्र रोठे पाटील,
राजकीय विश्लेषक, बुलढाणा
96 37 230 999