Comprehensive cleanliness campaign under the guidance of Commissioner in Naupada area of Thane. : ठाण्यात नौपाडा परिसरात आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सर्वंकष स्वच्छता अभियान.
दैनिक विश्वजगत ः संतोष पडवळ
ठाणे : नौपाडा परिसरात आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ६.३० वाजल्यापासून सर्वंकष स्वच्छता मोहिमेस सुरूवात झाली.
ठाणे : नौपाडा परिसरात आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ६.३० वाजल्यापासून सर्वंकष स्वच्छता मोहिमेस सुरूवात झाली. श्रीकौपिनेश्वर मंदिर, भाजी मंडई परिसर, जांभळीनाका परिसर, स्टेशन रोड तसेच तलावपाळी परिसरातील साफसफाई करुन परिसर पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आला. भारतीय नववर्ष गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसमवेत अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपूरे, नौपाडा परिमंडळचे उपायुक्त् शंकर पाटोळे, उपायुक्त अनघा कदम, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केस्वावानी, सहायक आयुक्त सोपान भाईक, वैदकीय आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मोहिमेत त्यांनी स्वत: हातात झाडू घेवून अंतर्गत रस्त्यांची, गल्ल्यांची साफसफाई केली. यावेळी कौपिनेश्वर मंदिर ते मराठी ग्रंथ संग्रहालय परिसराची पाहणी केली. या परिसरातील दुकानांच्या पाठी असलेल्या छोटया गल्ल्यांची सफाई केली. तसेच मुख्य रस्त्यांबरोबर अंतर्गत गल्ल्यांही नियमित स्वच्छ करण्याचे आदेश संबंधितांना दिले. तसेच तलावपाळी येथील सॅटिस पुलाच्या खाली असलेले राडारोडा त्वरीत उचलण्याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले.