Chavan accused of giving money to sensitive Chief Minister..!: संवेदनशील मुख्यमंत्र्यांना पैसे दिल्याचा चव्हाणांचा आरोप..!

कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर…!, अफवांना प्रसिद्धीची झालंर..!

मंत्री उदय सामंत नंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची बुलढाणा जिल्ह्यातील प्रचारात लगेच हेलिकॉप्टर द्वारे आघाडी. प्रतापरावांची प्रचारात आगे कुछ सुरू झाली. परंतु प्रचारात आघाडीचे रूपांतर मतांमध्ये, विजयामध्ये करणे प्रतापरावांसाठी यावेळी दिवा स्वप्नच आहे. संवेदनशील मुख्यमंत्री प्रचाराबरोबर जिल्ह्यातील बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, अवैद्य धंदे, लोकसभेवर बहिष्कार टाकलेल्या गावांच्या समस्या, पाणीटंचाई, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती, गारपीट अशा असंख्य समस्यांनी जिल्हा ग्रासलेला आहे.वर्तमान परिस्थितीचे सिंहावलोकन करण्याची तसदी मुख्यमंत्री एकनाथराव घेतीलच.


तर खुद्द मुख्यमंत्र्यांना पैसे देऊन आलेलो आहे. तुमच्याकडून जे होते ते करून घ्या. ही हुकूमशाहीची भाषा वापरणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांच्या बोलण्यातील सत्य सुद्धा ते अधोरेखित करतील. भ्रष्ट,हुकूमशा जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांच्या तक्रारीचा पाढा त्यांच्यापर्यंत पोहोचलाच आहे त्यावरही ते भाष्य करतील._
महा लोकशाही विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलम शाह ‌ मुस्लिम समाजाचे गठ्ठोटी घेणारे उमेदवार असे असताना मीही अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या खूप जवळचा असो माझ्याकडे सुद्धा मुस्लिमांचे मतदान मोठ्या प्रमाणात येईल या अविर्भावात काही नेते अफवांचे राजकारण करून अल्पसंख्यांकांना जवळ करण्याचा व्यास जाणीवपूर्वक करीत आहेत
तर काही नेते स्वतःहून स्वतः काही अफवांना मुठ माती देत प्रसिद्धी माध्यमांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयास करीत आहे. दरम्यानच्या काळात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वीस जागांमध्ये फिक्सिंग असल्याचे पुराव्यासह जाहीर केले. त्यामध्ये बुलढाणा अग्रस्थानी आहे. महायुतीच्या उमेदवारासाठी जर महाआघाडी कामाला लागले असेल तर लोकसभा रणसंग्राम हा जनसामान्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरतोय. एकीकडे वंचितचे उमेदवार वसंतराव मगर अद्यापही प्रचारापासून वंचितच आहे.असलम शहा सामाजिक मतांच्या ध्रृविकरणात विजयाचे शिल्पकार होताना दिसत सद्यस्थितीत प्रचारात आघाडीवर आहेत. रविकांत तुपकर हे भारतीय जनता पार्टीत जाणार अशा अफवांना ऊत आले आहे. परंतु निवडून आले तरच जातील..? की निवडणुकीच्या पूर्वीही जाऊ शकता का…? अशा असंख्य अफवांना पेव फुटले. परंतु आज रविकांत तुपकर यांनी आपली भूमिका जाहीर केली की मी शेतकरी चळवळीतला असून शेतकऱ्यांचा सोबत राहील. ना मी इकडे जाणार ना मी तिकडे जाणार. यापूर्वी केलेली चूक पुन्हा करणार नाही..! मी पुन्हा येईल असा शब्द दिलेला नाही. अशाच आशयाचा तुपकरांनी आज निर्धार जाहीर केला. तर तोच निर्धार येणाऱ्या काळात ते प्रतिज्ञा लेखावरही जाहीर करतील यात दुमत नाही. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी वेळ पडल्यास राजीनामाही देतील.? इतरही पंधरा उमेदवार आहेत. तेही आपल्या परिसरातील काही प्रमाणात का होईना मतांचे विभाजन करण्यात यशस्वी होत आहे. एकंदरीत मराठा हिंदू पन्नास पंचावन्न टक्के वोटिग साडेसहा लाखापर्यंत जाईल. दलितांचे 65 ते 70 टक्के वोटिंग दीड लाखापर्यंत. आणि मुस्लिमांचे 65 ते 70 टक्के वोटिंगतीन ते साडेतीन लाखापर्यंत आहे.
तर इतर मध्ये एकूणच मतदार चाळीस हजारापर्यंत आहे.त्यातील 55 टक्के म्हणजे 20 ते 25 हजारापर्यंत वोटिंग होण्याची शास्वती आहे. मराठा, माळी, व इतर सर्व अठरा पगड जातीतील एकूण हिंदू, दलित, मुस्लिम यांच्या मतांचे विभाजन पाहिल्यास राजकीय विश्लेषकांची अत्यावशकता भासणार नाही..! कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर आहे. त्यात मराठा आरक्षण आणि मनोज जरंगे पाटलांची भूमिका फॅक्टरही 30 ते 40% काम करणार आहे. बाकी समजदार को इशारा काफी है.! तूर्तास एवढेच.

✍🏻अँड.सतीशचंद्र रोठे पाटील,
राजकीय विश्लेषक,
बुलढाणा.9637230999