उमेदवार असलम शहांचेच नाव यादीतून गायब..!
▪️सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची मध्यस्थी.
▪️उमेदवाराला दोन तास तात्कळत राहावे लागले.
▪️सामान्य नागरिकांचे काय..?
▪️मतदार यादी व ऑनलाईन यादी दोषपूर्ण असल्याचे सिद्ध.
▪️इंदीरा नगर, अपंग महाविद्यालय बुथवरील प्रकार.


बुलढाणा:
महालोकशाही विकास आघाडीचे उमेदवार असलम शाह यांचे नावच मतदार यादीत नाही.
तर उमेदवारी अर्ज भरतांना मतदार यादी क्रमांक, भाग क्रमांक, ऑनलाईन होता.परंतु तो ही दिसत नाही.
त्यांच्यासह असंख्य नागरिकांना तर प्रामुख्याने मुस्लिम मतदारांना हीच अडचण येत आहे. असलम शहा समशहा यांच्याकडे यादी भाग क्रमांक मतदार यादी क्रमांक आणि ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरताना दिलेली पावती असल्यामुळे त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने चिठ्ठी बनवीत मतदान करू दिले. परंतु इतरांचे काय हा प्रश्न अद्याप प्रलंबितच आहे.
जाणीवपूर्वक मुस्लिम बहुल भागात मतदार यादीतील घोळ केल्याचे प्रामुख्याने समोर येत आहे.
सद्यस्थितीत इंदिरानगर परिसरातील अपंग महाविद्यालय या ठिकाणी सुरू असलेल्या मतदान बूथवर सदर गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किरण पाटील या अनुषंगाने पर्यायी व्यवस्था त्वरित करतील. अशी अपेक्षा महा लोकशाही विकास आघाडीचे उमेदवार असलम शाह हसन शाह यांनी यावेळी व्यक्त केली.
तरी संबंधितांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह, ऑनलाइन डाटा ऑपरेटर, मतदार यादी छपाई यंत्रणा, यांच्याशी संपर्क साधून त्वरित या अनुषंगाने पाऊले उचलावी. आणि वेळेच्या आत सर्वांना मतदान करता येईल अशी व्यवस्था करावी.
अन्यथा परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाऊ शकते.