Ashutosh Padghan’s weapons jailed.: आशुतोष पडघानचे हत्यारे जेरबंद.

मुख्यसूत्रधार आणि सहआरोपी फरारच.!
झिंगाट गँगचे भिंगाट हल्ले..!

ये पब्लिक है,सब जानती है..!
ब्रेकिंग न्यूज क्या है.!

गजानन काटे : दैनिक विश्‍वजगत
बुलढाणा: आशुतोष पडघान हत्या आणि कटकारस्थान प्रकरणात एका आरोपीसह सहा सहआरोपी तपासासाठी सद्यस्थितीत बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला पीसीआर मध्ये जेरबंद.परंतु यामागील मुख्य सूत्रधार कोण याचा शोध अद्याप गुलदस्त्यातच आहे..? सदर हत्येमुळे बुलढाणा शहरात खळबळ उडाली असून असे प्रकार दैनंदिन सार्वजनिक जयंतीच्या अनुषंगाने होत आहे. तर यामूळे जयंती उत्सवावर दहशतीचे सावट निर्माण करण्याचा कोणी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे का? यामागील मुख्य सूत्रधार कोण..? तर अशा घटनांमुळे सामाजिक दरी निर्माण करून फायदा कोणाला..? या सर्व प्रश्नांची उकल जिल्हा पोलीस अधीक्षक करतीलच यात दुमत नाही. सामाजिक स्तरावरून या हत्तेचा निषेध होत असून त्वरित तपास न लागल्यास जनसामान्यांचा आक्रोश प्रशासनावर तुटून पडू शकतो.
आशुतोष पडघान हा कुठे राहतो आणि जयंतीचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळत वृत्त प्रकाशित केले होते. जेणेकरून एका व्यक्तीमुळे परिसर किंवा

मिरवणूक च्या संस्कृती,परंपरेला धब्बा लागू नये.हा त्यामागील प्रांजळ हेतू होता.
(हत्या कोणाचीही असो दुख:तच घटना असते. त्यामुळे अशा घटनांचीही ब्रेकिंग न्यूज आणि त्याचे श्रेय लाटण्याचा किळसवाणा प्रकार हत्या पेक्षाही किळसवानाच आहे. एका ब्रेकिंग न्यूज मध्ये मृतक आशुतोष पडघान यांचा राहण्याचा पत्ता चुकीचा आलेला आहे .तसेच आडनावही पडघन हे चुकीचे चुकीने प्रकाशित झालेले असावे. व खरे आडनाव पडघान असे आहे. तर दोन्ही ब्रेकिंग मध्ये सदर नाव चुकीने प्रकाशित झाल्याचे समोर येत आहे. पुढील तपास बुलढाणा शहर पीआय नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनास सुरू आहे. त्यामागील मुख्य सत्रधार कोण आहेत त्याचाही शोध लागला पाहिजे या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांचाही तपास सुरू असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे.कोणत्याही बातमीचा आम्ही कधी प्रथम ब्रेकिंगचा दावा केला नाही. माहिती मिळताक्षणी बातमी तयार करून आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयास आहेच.त्यामुळेच दैनिक विश्व बातमीचे राजकीय विश्लेषक पत्रकार सतीशचंद्र रोठे यांनी सदर वृत्त रात्री दोन वाजून दहा मिनिटांनी आपल्या सेवेत सादर केलेले होते. त्यानुसार सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी पेपर प्रिंट होऊनही सदर बातमी प्रकाशित करण्यात आली होती.तर एका ब्रेकिंग न्यूजने आठ वाजून काही मिनिटांनी बातमी प्रकाशित केलेली असतांनाही ते प्रथम ब्रेकिंगचा दावा करताय ” ए पब्लिक है सब जानती है ” !