Appreciation ceremony for another student of Saptshringi family was completed :सप्तशृंगी परिवाराचा आगळावेगळा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न
ॲड.माधुरी देवनांद पवार यांच्या संकल्पनेतुन अमिरेकेतील मान्यवर मेहकर मध्ये
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवानंदभाऊ पवार यांच्या जन्मदिवसाचे अवचित्य साधून दिनांक ८ जुलै २०२४ रोजी सप्तशृंगी परिवाराने मेहकर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
सतत १० वर्षापासून सप्तशृंगी बँक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करीत असते, परंतु यावर्षी वैशिष्ट्य होते ते विदेशी पाहुण्यांचे. या कार्यक्रमासाठी खास अमेरिकेवरून ॲनी विलियम्स व केला कोरकोरॉन ह्या शिक्षण तज्ञ उपस्थित होत्या.
विद्यार्थी व पालकांची भरगच्च उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती. स्थानिक वेदिका लॉन मेहकर येथे हा भव्य दिव्य कार्यक्रम मोठा दिमाखदार पार पडला.
यावेळी मेहकर परिसरातील इयत्ता दहावी व बारावीतील तसेच शालेय स्तरावर आयोजित विविध स्पर्धा परीक्षांमध्ये ज्यांनी घवघवीत यश मिळवलं अशा विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी संस्थेच्या वतीने करण्यात आला.
संस्थेच्या अध्यक्षा ॲड. माधुरीताई देवनंद पवार यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाला आकार देण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्याला नुसते हारतुरे न देता त्यांना भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी मार्गदर्शनाची सुद्धा गरज असते ही गरज नेमकी सप्तशृंगी परिवाराने हेरली आणि विदेशामध्ये भारतीय विद्यार्थ्यांना कोणकोणत्या संधी असतात यांचे मार्गदर्शन करण्यासाठी अमेरिकेवरून पाहुण्यांना बोलवण्यात आले होते.
अमेरिकेतील फुल ब्राईट स्कॉलर ह्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. सातासमुद्रा पलीकडील पाहुण्यांना पाहण्यासाठी तसेच त्यांना ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांनी तोबा गर्दी केली होती. भारतातील फुल ब्राईट स्कॉलर असलेले डॉक्टर शिवाजीराव देशमुख हे सुद्धा या कार्यक्रमाचे आकर्षण होते. भारतीय विद्यार्थी त्यांचे शिक्षण प्रणाली आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पाहून पाहुणे भारावून गेले.
एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती व पालकांची उपस्थिती यांचा आवर्जून उल्लेख या अमेरिकेतील पाहुण्यांनी शिक्षण तज्ञांनी आपल्या भाषणामध्ये केला.
ॲनी विलियम्स ह्या अमेरिकेतील एका शेतकऱ्याची कन्या आहे अमेरिकेमध्ये शेती कशा पद्धतीने केली जाते आणि त्याचबरोबर शेती आणि शिक्षण यांचा कसा समनव्य साधला जातो हे त्यांनी आपल्या मनोगतातून विशेष उलेख्ख् केला पुढे बोलतना त्यांनी अमेरिकेमध्ये जवळपास ८०% शाळा या सरकारच्या आहेत आणि फक्त २०% शाळा ह्या खाजगी आहेत हे त्यांनी आवर्जून सांगितले आपली शाळा आपला परिसर याबद्दल त्यांनी पीपीटी च्या माध्यमातून मार्गदर्शन केले एक शेतकऱ्याची अमेरिकेमधील कन्या पाहून श्रोते अचंबित झाले.
अमेरिकेतील शाळा तिथली शिक्षण पद्धती ही मनाला भावणारी आणि श्रोत्यांच्या मनाला साद घालणारी ठरली अमेरिकेमध्ये शिक्षण घ्यायचे असेल तर काय करावे लागेल याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले .
भारतीय संस्कृती व अमेरिकन संस्कृती यांचा मिलाप घडवणारा हा कार्यक्रम किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी विशद केले. अन्नप्रक्रिया करून आपले वडील उद्योग कसा सांभाळतात हे सांगताना त्या भाऊक झाल्या. आपल्या बाह्य रूपाला महत्त्व न देता आपल्या अंतर्गुणांना जागृत करून यश मिळवायचं असतं हे त्यांच्याकडे पाहून नेहमी जाणवत होते. अमेरिकेतील शिक्षण पद्धती आणि युवक या विषयावर बोलताना अमेरिकन युवक कशाला महत्त्व देतात आणि अमेरिकन शिक्षण पद्धती त्यांच्या विकासाला कशी पोषक आहे हे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी आलेल्या दुसऱ्या प्रमुख मार्गदर्शक ‘केला कोरकोरॉन यांनी भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेतील शिक्षण संधी यावर प्रकाश टाकला.
दीड वर्षाच आपलं बाळ अमेरिकेमध्ये सोडून अभ्यास करण्यासाठी आलेल्या केला कोरकोरॉन यांच्या मार्गदर्शनात श्रोत्यांनी कित्येक वेळा टाळ्यांचा कडकडाट केला अमेरिकेतील व्यक्तींमध्ये शिक्षण घेण्याची उर्मी कशी असते याचा जिवंत उदाहरण त्यांनी आपल्या सादरीकरणातून मांडले.
अमेरिका हा प्रगत देश का आहे हे त्यांच्या शिक्षण प्रणालीतून प्रामुख्याने दिसले. जमिनीशी आपलं नातं दृढ ठेवत आकाशाला गवसणी घालण्याचे काम तेथील शिक्षण प्रणाली करत आहे. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये भरपूर वाव आहे अगदी शेती क्षेत्रापासून ते अंतरिक्ष क्षेत्रापर्यंत विद्यार्थ्यांना वेगवेगळे कोर्स उपलब्ध करून दिले जातात हे त्यांनी सांगितले.
भारतातील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर सारख्या ग्रामीण भागामध्ये अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आयोजकाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधला कमालीची नम्रता आणि कोणताही अभिनवेश न बाळगता श्रोत्यांशी त्यांनी केलेला संवाद श्रोत्यांची मने जिंकून गेले..
भारतामधून अमेरिकेमध्ये फुल ब्राईट स्कॉलर म्हणून ज्यांची निवड झाली होती असे डॉक्टर शिवाजीराव देशमुख यांनी श्रोत्यांनी इंग्रजीमध्ये सांगितलेला संवाद मराठी मध्ये अनुवादित करून तसेच त्यांचा एकूण प्रवास आपल्या मनोगतामध्ये विशद केला साखळी बुद्रुक सारख्या जिल्हा परिषद शाळेपासून अमेरिकेपर्यंतचा प्रवास आणि अमेरिकेतील लोकांची त्यांना आलेली प्रचिती सांगताना देशमुख सर कमालीचे भाऊक झाले होते.
सप्तशृंगी परिवाराची चालत असलेली घोडदौड त्यांची सामाजिक कार्य श्रोत्यांची मने जिंकून गेले सामाजिक निधीचा योग्य तो वापर आणि खऱ्या अर्थाने भविष्यातील आव्हाने व प्रश्न यांच्या संदर्भात सप्तशृंगी परिवाराच्या एकूणच उपक्रमांचा जागर खूप छान वाटला.
सप्तशृंगी परिवाराच्या अध्यक्षा ॲड. माधुरीताई पवार यांच्या कल्पक नियोजनातून हा कार्यक्रम पार पडला आपल्या मनोगतातून बोलताना आपले वडील देवानंद भाऊ पवार यांनी आपल्या लेकी प्रती दाखवलेला विश्वास व मदत त्यांनी विशद केली सप्तशृंगी बँकेचा एकूण प्रवास ठेवीदारांनी त्यांच्यावर ठेवलेला विश्वास कर्मचाऱ्यांची सजगता व संचालक मंडळाचे सहकार्य यावर त्या भरभरून बोलल्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी नेहमीच नवनवीन कार्यक्रम घेऊन या परिसराला समृद्ध करण्याचे काम सप्तशृंगी परिवार करत असतो आणि समाजकार्याचा हा वसा आपल्याला आपल्या वडिलांकडून मिळाला असे त्यांनी सांगितले आपले वडील देवानंद भाऊ पवार यांच्या विषयी बोलताना त्या म्हणाल्या
बापाने पंखांना बळ दिले
स्वप्न दाखवले आणि उडायला शिकवले
पहाडा सारखा बाप पाठीशी उभा आहे
म्हणूनच लढले आणि जगायला शिकले…
बापाच्या ओठावर हसू
आणि डोळ्यात स्वप्न आहेत
बापाला अश्रू आवडत नाहीत
बापाने कणखर केले जगणे
बापाने कष्टाचा वसा दिला
जगण्याची कला शिकवली…
सप्तशृंगी परिवाराच्या अध्यक्ष ॲड. माधुरीताई पवार यांनी कमी काळामध्ये संस्थेचा संस्थेच्या प्रगतीचा आलेख हा खूप उंचीवर नेऊन ठेवला एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची मेजवानी परिसरातील गुणवंत विद्यार्थी व पालकांना त्यांनी दिली त्याबद्दल पालक त्यांचे कौतुक करताना दिसले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा ॲड. माधुरी पवार यांनी केले तसेच संस्थेचे उपाध्यक्ष विष्णू वाकळे यांनी आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाअध्यक्ष लक्ष्मण दादा घुमरे हे होत्र त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत असताना सप्तशृंगी परिवाराचे विशेष कौतुक केले. यावेळी त्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा ॲड. माधुरी देवनंद पवार यांना शुभेच्छा दिल्या
तथा प्रमुख पाहुणे म्हणून मेहकरचे माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी यांनी देखील आपल्या मनोगतातुन उपस्थिती विद्यार्थाना मार्गदर्शन केले व देवनंद भाऊंच्या पायि दिंडी सोहळ्याचे विषेश कौतुक केले.
तसेच जिल्हा परिषद बुलढाणा चे माजी अध्यक्ष भास्करराव ठाकरे यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती.
संस्थेचे संचालक मनिष धोटे, राजेंद्र देवकर, व्यवस्थापक सुभाष खरात हे ह्या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित पत्रकार बांधवांचा सत्कार आणि योग्य तो सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सप्तशृंगी परिवारातील सदस्याने प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे सर व बावस्कर मॅडम यांनी केले.
तर आभार प्रदर्शन सप्तशृंगी बँक मेहकर शाखेचे व्यवस्थापक राजू शिंदे यांनी केले.
● बाप भक्ती मार्गस्त असताना म्हणजे देवानंद भाऊ व सहपत्नीसह माऊलींच्या दिंडीमध्ये सामील असताना आपल्या बापाचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने केल्या गेल्या पाहिजे म्हणून देवानंद भाऊ यांची लाडली लेक एडवोकेट माधुरी पवार यांनी त्यांच्या संकल्पनेतून अमेरिकेतील मान्यवर बोलून बापाचा केला आगळावेगळा वाढदिवस
सप्तशृंगी परिवाराचा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला लागले चार चाँद.
● जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात अँड .माधुरी देवानंद पवार यांनी अमेरिका येथील शिक्षण तंज्ञ अँन विलियम्स व कोरकोराँन यांना ग्रामीण भागात आणुन विद्यार्थी विद्यार्थिनीची शैक्षणिक प्रोत्साहन या कार्यक्रमामुळे मिळाले.