भिंतीला आदळून कारचा अपघात; एक ठार तर दोघे जखमी

गजानन पेपर मिल जवळील घडली घटना

गोपाल काटे –

मोताळा :- मोताळा येथील 22 वर्षीय पियुष चंद्रशेखर संचेती हे आपल्या दोन मित्रांसह कारची सर्विसिंग करिता जळगाव खान्देश येथे गेले होते कारची सर्विसिंग करून परत येत असताना मलकापूर येथे बुलढाणा रोडवरील गजानन पेपर मिल जवळ भिंतीला त्यांची कार धडकली त्या अपघातातच कार चालवीत असणारा पियुष चंद्रशेखर संचेती वय 22 यांचा जागीच गाडीत दबून मृत्यू झाला तर त्याच्यात सोबत असणारे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की मोताळा येथील स्वर्गीय बबनराव देशपांडे विद्यालयात कार्यरत असलेले चंद्रशेखर संचेती यांचे पुत्र पियुष संचेती आपल्या दोन मित्रांसह विश्वजीत महादेव देशमुख व आशुतोष ज्ञानेश्वर जोहरी यांच्यासोबत आपली कार सर्विसिंग करिता जळगाव येथे गेले होते कारची सर्विसिंग
आटोपल्यावर अजिंठा रोडवर त्यांनी लाईटचे काम सुद्धा केले काम आटोपल्यावर तेथून परतता ना बुलढाणा रोडवरील गजानन पेपर मिल जवळ रात्री पावणे बाराच्या सुमारास भिंती वर गाडी धडकून अपघात झाला या अपघातात पियुष चंद्रशेखर संचेती वय 22 हा गाडीच्या आत दबून त्याचा जागीच मृत्यू झाला
याबाबत मलकापूर येथे उपविभागीय रुग्णालयात त्याला दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले व त्यासोबत असलेले बाकी दोन मित्र गंभीर जखमी झालेले आहेत त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रविकांत बावस्कर बक्कल नंबर 671 यांनी मर्ग दाखल केला आहे. तर पोहेका भगवान सुरडकर बक्कल नंबर 925 अधिक तपास करीत आहे.मलकापूर येथील रा. स्व. संघाचे तालुका संघचालक स्वर्गीय काकाजी संचेती यांचे सुपुत्र चंद्रशेखर संचेती हे बबनराव देशपांडे विद्यालयात कार्यरत आहेत बऱ्याच काळापासून ते मोताळा येथे सामाजिक व राजकीय कार्यात कार्यरत आहे त्यांच्या मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच मोताळा व मलकापूर परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून शोककाळा पसरली आहे.