* अवैध रेती टिप्परने महिलेला चिरडले.
* रेती माफियांची गुंडागर्दी बेलगाम.
* आझाद हिंद रस्त्यावर उतरणार..!
* परिस्थिती तणावग्रस्त.
* तरीही अवैध टिप्पर सुरूच..!
* दलाली भेटल्यामुळे प्रशासन ढिम्मच.
* आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन अलर्टवर मोडवर येईल…?

अनधिकृत रेती माफियांच्या भरधाव वेगाने चालणाऱ्या अनधिकृत टिप्पर मुळे जिल्ह्यातील असंख्य नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर मृतांमध्ये मागील काळात भादोला येथील पोलीस कर्मचाऱ्यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. तशीच दुर्दैवी घटना आज आज सकाळी उदावंत बाईक शोरूम नांदुरा जवळ घडली आहे. सकाळी पती-पत्नी फिरायला गेले होते.त्यावेळी अनधिकृत रेती वाहतूक करणाऱ्या बेभान टिप्परने महिलेस धडक देऊन चिरडले. महिला जागीच गतप्राण झाली अवैध टिप्पर चालक-मालक फरार झाले.दुर्दैवाची बाब म्हणजे लगेच त्याच्या पाच मिनिटानंतर अनधिकृत टिप्पर सुरूही झाले.हेलगे नगर,परिसरातील झांबड शाळेवरील स्कूल बस चालक बाळूभाऊ बोचरे यांच्या पत्नीच्या मृत्यूने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे. मृतदेह पोस्टमार्टम साठी नांदुरा शासकीय रुग्णालयात जमा करण्यात आला आहे. तर अद्यापही अवैध रेती वाहतूक पाच मिनिट सुद्धा थांबली नाही. या अनुषंगाने आझाद हिंद शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून अनधिकृत रेती वाहतूक बंद करण्याची तसेच संबंधितावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे.हे विषेश.