A policeman was robbed at knifepoint चाकुचा धाक दाखवत दुचाकीस्वाराला लुटले
दोघांना एका दिवसाची पोलीस कोठडी
गोपाल काटे –
मोताळा :- 45 वर्षीय दुचाकीस्वाराला ला चाकूचा धाक दाखवीत 12 हजार रुपये काढून घेतल्याची घटना मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी खरबडी फाटा मोताळा येथे घडली या बाबत संजय अजबराव पारसकर वय 45 राहणार भोटा तालुका नांदुरा यांनी बोराखेडी पोलीस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे. की, फिर्यादी संजय पारसकर हे खरबडी फाटा मोताळा येथून शिरवा येथे त्यांच्या मोटर सायकल ने जात असताना तेथे आरोपी राजेश सरदार सिंग सोळके वय 23 वर्ष शेख साहिल शेख मुनाफ वय 21 वर्ष दोन्ही राहणार खरबडी तालुका मोताळा हे फिर्यादी संजय पारसकर यांना भेटले व दोन्ही आरोपी हे संजय पारसकर त्यांच्या मोटरसायकलने खामखेड जात असताना नमूद दोन्ही आरोपी ने फिर्यादी संजय पारसकर यांना चाकूचा धाक दाखवून संजय पारसकर यांच्या पॅन्ट च्या खिशातील नगदी 12000 रुपये काढून घेतल्याच्या संजय पारसकर यांच्या फिर्यादी वरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी राजेश सरदार सिंग सोळके वय 23 वर्ष शेख साहिल शेख मुनाफ वय 21 वर्ष दोन्ही राहणार खरबडी तालुका मोताळा दोघा विरुद्ध अप क्रमांक 218/24 च्या कलम 392,34 भांदवी नुसार गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना दिनांक 1 मे 2024 बुधवार रोजी मोताळा येथील न्यायालयाने दोन्ही आरोपीची एका दिवसा करिता पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या बाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक नवलकार यांच्या मार्गदर्शनाखाली एन.पी.सी अमोल खराडे करीत आहे.