Cylinder will win because of Sage Soyre, NRC, infidels. Ad.Satishchandra Rothe Patil.
सगे सोयरे, एनआरसी,काफीरांमुळे सिलेंडर विजयी होनार.
अँड.सतीशचंद्र रोठे पाटील.
चिखल फेक करून जनतेच्या ज्वलंत प्रश्नांना बगल दिली.!
महायुती महाविकास आघाडीचा पराभव निश्चित..!
उमेदवार असलम शाह.
बुलढाणा :
सीएए,एनआरसी,मराठा आरक्षण,सगे सोयरें, मराठा भगीनींवर झालेला लाठी हल्ला. बेरोजगारी, पाणीटंचाई, सिंचन,विकास,महिलांची सुरक्षा, जातीनिहाय जनगणना, शिक्षण,आरोग्य,अवैध धंद्यावर जाणीवपूर्वक मौन ठेवले. स्वयं केंद्रित चिखल फेक करून जिल्ह्यातील वातावरण खराब केले. त्यामुळे अशा उमेदवारांना,महायुती महाआघाडीच्या उमेदवारांना आता जिल्ह्यातील जनता धडा शिकवेलच असा विश्वास असलम शाह यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकारद्वारे व्यक्त केला आहे.
जिल्ह्यातील साडेबाराशे गावात प्रत्यक्ष संवाद साधत जनतेचा जाहीरनामा जनतेच्या स्वाधीन केला आहे. प्रत्येक ठिकाणी प्रचारादरम्यान मराठा,बहुजन,मुस्लिम बांधवांनी सिलेंडरला पाठिंबा देत विजयी करण्याचा संकल्पसूद्धा केलेला आहे. त्यामुळेच गॅस सिलेंडर विजयी होनार आहे.असा विश्वास महाविकास आघाडीचे संयोजक ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील यांनी संयुक्त पत्रकाद्वारे जाहीर केला आहे.
हिंदू ,मराठा आणि दलित मतांचे पाच ठिकाणी विभाजन होत आहे. त्यामुळे एकमेव मुस्लिम उमेदवार म्हणून मी बहुमताने निवडून येणार असल्याचे मतही असलम शाह यांनी व्यक्त केले.
जाहीर प्रचारानंतर,सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष फोनवरून संपर्क साधण्याचा अजेंडा असलम शहा यांनी यावेळी जाहीर केला.
कोणत्याही बुथवर काही अडचण आल्यास आपण प्रत्यक्ष उमेदवार असलम शाह हसन शाह व उमेदवाराचे अधिकृत प्रतिनिधी अँड.सतीशचंद्र रोठे पाटील यांच्याशी संपर्क साधावा. 9860029834, 9637230999
पुढील पाच वर्षाच्या गुलामगिरीतून बाहेर निंघण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी दक्ष व सतर्क राहायचे आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता विचारपूर्वक आपले मतदान करायचे आहे. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे असेही आवाहन यावेळी पत्रकातून करण्यात आले आहे.