Everything will be done for the victory of Aslam Shah. Farmer leader Prakash Pohre.

असलम शाह यांच्या विजयासाठी सर्वस्व पनाला लावणार.
शेतकरी नेते प्रकाश पोहरे.

रखरखत्या उन्हातही हिंदू मुस्लिम रणरागिन्यांचा एल्गार..

असलम शहांची विजयासाठी आगेकूच.

बुलढाणा: असलम शहा यांच्या विजयासाठी किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनायक प्रकाशभाऊ पोहरेही उतरणार लोकसभा रणसंग्रामात.
आज महालोकशाही विकास आघाडीच्या वतीने ऍड सतीशचंद्र रोठे पाटील असलम शाह, शिरला नेमाने येथील श्रीश्रीश्री देवसिंग गिरी महाराज यासह आदी पदाधिकाऱ्यांनी प्रकाश पोहरे यांची अकोला येथील वेदनंदिनी येथे भेट घेतली. यावेळी पोहरेंनी बुलढाणा लोकसभेत किसान ब्रिगेडचा एक सामान्य कार्यकर्ता महा लोकशाही विकास आघाडीचा उमेदवार म्हणून असलम शाह यांना निवडून आणण्यासाठी किसान ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.
तर असलम शाह यांच्या विजयासाठी सर्वस्व पनाला लावण्याचाही निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मोताळा, नांदुरा तालुक्यातील घाटाखालील भागात आज असलम शाह यांच्या प्रचारासाठी हिंदू मुस्लिम रणरागिन्यांनी रखरखत्या उन्हातही प्रत्येक घरात घरात भेट दिली. जनतेचा जाहीरनामा वचन नामा प्रतिज्ञा लेखावर सही करून सादर केला. यावेळी बहुसंख्य कॉर्नर सभांही घेतल्या. प्रचार अभियानात निर्मलाताई रोठे पाटील, योगिताताई रोठे पाटील, रुकसाना बानो, पंचफुला गवई, सुरेखाताई निकाळजे, सिंधुताई अहेर, सुमनताई राजपूत, संजय ऐंडोले,शहबाज शाह, गुणवंत पाटील, आदित्य गवई यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या प्रचार अभियानामध्ये सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर,महिलांसह नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी उत्सृर्त प्रतिसाद दिला.