Gajanana Saade for Aslam Shah’s victory..!असलम शहांच्या विजयासाठी गजाननाला साकडे..!
ईदमुळे सर्वधर्मसमभावाची भावना वृद्धिंगत. अँड रोठे पाटील.
आझाद हिंदचा विजयाचा इन्कलाब पोहचतोय घ्या घरात..!
दैनिक विश्वजगत ः गजानन काटे
बुलढाणा :महालोकशाही विकास आघाडी चे अधिकृत उमेदवार असलम शाह हसन शाह यांच्या विजयासाठी आझाद हिंद शेतकरी संघटना, आझाद हिंद महिला संघटना, वारकरी परिषद तथा महालोकशाही विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा इन्कलाब बुलंद करीत पाई गावंन गाव पिंजून काढत आहे.
बुलढाणा तालुक्यातील महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त वंदन करून प्रचाराला प्रारंभ करण्यात आला. खामगाव,शेगाव, टाकळी विरोहट, नांद्राकोळी, वरूड, गव्हाण यासह पंचक्रोशीतील गावांमध्ये असलम शहांच्या विजयासाठी कॉर्नर सभांना उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तर कॉर्नर सभा आणि प्रचार दौऱ्या दरम्यान आझाद हिंद च्या पदाधिकाऱ्यांनी विदर्भाची पंढरी अवलिया संत गजानन बाबांना सुद्धा आज साकडे घातले. प्रचारा दरम्यान गावगाड्यातील समस्या ही या निमित्ताने समोर आल्या.तर खासदारांना मागील वीस वर्षात पाहिलेच नाही., पाणी टंचाई आहे .रोजगार हमी योजनेची कामे नाही, गुरांसाठी चारा नाही, अशा असंख्य तक्रारी शेतकरी,शेतमजुरांनी संपर्क दरम्यान व्यक्त केल्या.आजपर्यंत एकही लोकसभेचा उमेदवार आमच्या गावात प्रचारासाठी आला नाही अशा समस्या तक्रारींचं गाठोळ बांधत आझाद हिंदचा इन्कलाब घराघरात पोहोचतोय. सामान्य नागरिक महिला शेतकरी शेतमजुरांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.तर एका सामान्य कार्यकर्त्याला लोकसभेची उमेदवारी मिळाल्याचा आनंदही सामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसतोय.
आज ईद ऊल फितर निमित्ताने जिल्ह्यातील महत्त्वाच्या गावांमध्ये मुस्लिम बांधवांचीही भेट अभियानात सहभागी पदाधिकाऱ्यांनी घेतली. ईद मुळे आज सर्वधर्मसमभावाची भावना वृद्धिगत होत असल्याची प्रतिक्रियाही यावेळी रोठे पाटील यांनी व्यक्त केली. तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सार्वजनिक जयंती उत्सवाच्या बहुसंख्य कार्यक्रमातही आज अस्लम शहांनी भेट देत महात्मा फुलेंना वंदन केले.आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे पाटील, सुरेखाताई निकाळजे, योगिताताई रोठे पाटील,पंचफुला गवई,गुणवंत पाटील, सिंधुताई अहेर, नलिनीताई उन्हाळे,योगेश कोकाटे, आदित्य गवई, संजय एंडोले यांनी कॉर्नर सभांचे नेतृत्व केले.