शिवमहापुराण कथा तथा अंखड हरिनाम संकिर्तन सप्ताहाला सुरुवात

शिवखंडेश्वर मंदिर, पुन्हई येथे शिवमहापुराण कथा तथा अंखड हरिनाम संकिर्तन सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली आहे.
शिवपुराण कथा प्रवक्ते- ह.भ.प.श्री. आकाश महाराज आमले (खुमगांव बु ता.नांदुरा) यांच्‍या सुमधूर स्‍वरात कथा प्रवचनाला सुरुवात झाली आहे.

दैनिक विश्‍वजगत : गजानन काटे
पुन्‍हई ः शिवखंडेश्वर मंदिर, पुन्हई येथे शिवमहापुराण कथा तथा अंखड हरिनाम संकिर्तन सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली आहे.
शिवपुराण कथा प्रवक्ते- ह.भ.प.श्री. आकाश महाराज आमले (खुमगांव बु ता.नांदुरा) यांच्‍या सुमधूर स्‍वरात कथा प्रवचनाला सुरुवात झाली आहे. – दैनंदिन कार्यक्रम – काकडा आरती सकाळी ५ ते ६, शिवमहापुराण कथा सकाळी ८:३० ते ११:३० व दुपारी ३ ते ५ आजचे किर्तनकाराचे ह. भ. प. श्री. गोपाल महाराज अवकाळे, मलकापुर हे आहेत तर आजचा अल्पोपहार श्री.त्र्यंबक भिलाजी काटे व अन्नदाते स्व. निवृत्ती भावजी सहावे यांचे स्मृतीप्रित्यर्थ आहे. सोमवार ८ एप्रिल ला किर्तनकार ह.भ.प. कु. ज्ञानेश्वरीताई शिंदे, मेहकर यांचे किर्तन राहिल अल्पोपहार गोपाल सोपान राऊत व अन्नदाते गणेश शिवाजी घोंगटे हे राहतील. मंगळवार ९ एप्रिलला किर्तनकार ह. भ. प. श्री. आकाश महाराज आमले (गाथामुर्ती) खुमगांव बु. अल्पोपहार अरुण वासुदेव चोपडे अन्नदाते उज्वल डिगांबर भंगाळे हे राहतील बुधवार १० एप्रिलला किर्तनकार ह.भ.प. श्री. कल्पेश महाराज, उमाळा ता. जामनेर तर अल्पोपहार प्रसाद राजेंद्र काळे व अन्नदाते शांताराम भिलाजी काटे हे राहतील. गुरुवार ११ एप्रिलला किर्तनकार ह.भ.प. श्री. शुभम महाराज, तळणी तर अल्पोपहार कान्हु मोतीराम पाचपोळ व अन्नदाते बांगर परिवार हे राहतील. शुक्रवार १२ एिप्रलला किर्तनकार ह.भ.प. कु. योगिनीताई वसतकार, येरळी व अन्नदाते हरी गजानन चोपडे हे राहतील.

निवार १३ एप्रिलला किर्तनकार ह.भ.प. श्री. प्रमोद महाराज बांगर, पुन्हई तर अल्पोपहार गजानन रामगिर गिरी व अन्नदाते उल्हास मधुकर कोलते हे राहतील. रात्री वाघे मंडळ मल्हारी यांच भजन कार्यक्रम वेळ. ९ ते १२ राहिल. रविवार १४ एप्रिलला काल्‍याचे किर्तनकार ह.भ.प. श्री. मुरलीधर महाराज बाप, राहुड तर अल्पोपहार रमेश काशिराम राऊत यांच्‍याकडून राहिल. दिंडी सोहळा व रात्री भारूडाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्याक्रमाला गायनाचार्य, मृदंगाचार्य व समस्त टाळकरी व भजनी मंडळी पुन्हई यांचे सहकार्य लाभणार आहे. तरी कार्यक्रमास सांप्रदायीक भजनी मंडळ – अंत्री, बोराखेडी, शिरखा, बडगांव, सारोळा पिर, सारोळा मारोती, काबरखेड, भाडगणी, डिडोळा, तालखेड, शेलापुर, तांदलवाडी, आडविहीर, मोताळा, चिंचपुर, वरुड, खरबडी, फर्दापुर व पंचक्रोशीतील भजनी मंडळींची उपस्‍थिती लाभणार आहे. अशी माहिती आयोजक-समस्त गांवकरी मंडळ व भजनी मंडळ, पुन्हई जय मल्हार मित्र मंडळ, पुन्हई यांच्‍याकडून कळविण्यात आलेली आहे तर परिसरातील समस्‍त भाविक भक्‍तांनी या शिवपुराण कथेचा लाभ घ्यावा ही विनंती.