Shri Ram Navami Utsav Committee President Dr. Mane’s choice : श्री राम नवमी उत्सव समिती अध्यक्षपदी डॉ. माने यांची निवड

दैनिक विश्‍वजगत  :अमोल कल्याणकर
मालेगांव – प्रभु श्री रामचंद्र नवमी जन्मोत्सव समिती गठीत करण्यात आली असून त्यामध्ये अध्यक्ष पदी सर्वानुमते डॉ. विवेकजी माने यांची निवड करण्यात आली आहे. शहरातील मालनेश्वर मंदिरात ही सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळीं शहरातील अनेक हिंदू बांधव उपस्थित होते. त्यावेळी आगामी प्रभु श्री रामचंद्र जन्मोस्तव नवमी च्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. त्यावेळी प्रभु श्री राम नवमी उत्सव समिती मालेगांव तालुका अध्यक्ष पदी डॉ विवेकजी माने व उपाध्यक्ष पदी आशिष बळी यांची निवड झाल्या बद्दल त्याचे अभिनंदन करण्यात आले.