Plight of passengers due to lack of bus station at Nyahlod : न्याहळोद येथे बस स्थानक अभावी प्रवाशांचे हाल

दैनिक विश्‍वजगत ः संजय महाजन

गेल्या कित्येक वर्षापासून नव्याने बस स्थानक उभारण्याची मागणी होत असून प्रवाशांना पावसाळ्यात व उन्हाळ्यात ताटकळत उभे राहावे लागते. वयोवृद्ध व बालके यांना बसची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभे राहून वाहनांची नेहमीच वर्दळ होत असल्याकारणाने कर्कश आवाज व गाड्यांच्या धुळीमुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. उन्हाळ्यात व पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हाल होत असून परिवहन विभागाने येथे पिकअप शेड उभारावे अशी मागणी जोर धरीत आहे.

शिर्डी : परिसरातील न्याहळोद लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून मोठे असून देखील येथे सुसव्य असे बसस्थानक नसल्याने प्रवासी तसेच विद्यार्थी वर्गाला घाण व दुर्गंधी मध्येच ताटकळत उन्हामध्ये बसची वाट पाहावी लागते , बस ची वाट पाहत असताना येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांच्या कर्कश आवाज व धूळ यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.
न्याहळोद परिसरा लगत कौठळ , तामसवाडी, हेंकळवाडी, कापडणे, विश्वनाथ, सुकवड, जापी, शिरडाणे, बिलाडी आदि गावाच्या मध्यभागी असून येथे प्रवाशांची नेहमीच वर्दळ सुरू असते. रस्त्याला लागून घर गटारी व दुकान वसलेली आहेत, यामुळे प्रवाशांना घाण व दुर्गंधी मध्येच बसची वाट पहावी लागत असते, पंधरा हजार लोकवस्तीचे गाव असून देखील प्रवाशांना बसण्यासाठी सुविधा नसल्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना नेमके बस स्थानक कुठे आहे हेच कळत नसल्याने पंचायइत निर्माण होते. बस स्थानकाअभावी प्रवाशांची गैरसोय
गेल्या कित्येक वर्षापासून नव्याने बस स्थानक उभारण्याची मागणी होत असून प्रवाशांना पावसाळ्यात व उन्हाळ्यात ताटकळत उभे राहावे लागते. वयोवृद्ध व बालके यांना बसची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभे राहून वाहनांची नेहमीच वर्दळ होत असल्याकारणाने कर्कश आवाज व गाड्यांच्या धुळीमुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. उन्हाळ्यात व पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हाल होत असून परिवहन विभागाने येथे पिकअप शेड उभारावे अशी मागणी जोर धरीत आहे.
घाणीचे साम्राज्य
बस स्थानकालगत सभोवताल प्रचंड प्रमाणावर घाण व दुर्गंधी येत असल्याने बस स्थानकाच्या काही अंतरावर महिला सौचालय असून शौचालयाची दुर्गंधी सर्वत्र पसरत असते बस स्थानकाच्या चहुबाजूने दुर्गंधी दरवळत असते यामुळे येथील परिसरातील ग्रामस्थांचे व प्रवाशांच्या आरोग्य धोक्यात सापडले आहे, परिसरातून नेहमीच शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी धुळे येथे जात असतात. परंतु बसस्टॉप जवळ पुरुष व महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था नसल्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागत असते.
असुविधांमुळे खाजगी वाहनाकडे कल
परिवहन विभागाच्या दिवसातून नऊ ते दहा फेऱ्या होत असून त्या कौठळ तामसवाडी हेंकळवाडी या गावा पुरता मर्यादित असतात महामंडळ वेळेवर गाडी सोडत नसल्याने व अस्ताव्यस्त वाहन खिडक्या तुटलेल्या, बस मध्ये सीट देखील तुटलेल्या परिवहन महामंडळ बस सोडत असते. न्याहळोद गावाला स्वतंत्र बस देखील नसल्याने प्रवाशांना खासगी वाहन कडे धाव घ्यावी लागते. खाजगी वाहन धारक नको ते दर आकारत असून प्रवाशांना जास्तीच्या आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तरी महामंडळाने चांगल्या बसेस सोडण्यात याव्यात विद्यार्थी व प्रवाशांना वेळेवर बसेस सोडाव्यात अशी मागणी होत आहे.

 

विद्यार्थ्यांना स्वतंत्र बसेस ची मागणी
न्याहळोद येथे दहावी ते बारावी पर्यंत शाळा असून उच्च शिक्षणासाठी धुळे येथील एसएसव्हीं पी एस , जय हिंद महाविद्यालय तसेच महिला कमलाबाई अजमेरा व महाजन विद्यालयात विद्यार्थी शिक्षणासाठी येथून विद्यार्थी ये-जा करीत असतात यासाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र बसची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाकडे धाव घ्यावी लागते कौठळ, तामसवाळी येथून गाड्या भरगच्च भरून येत असल्यामुळे येथे बसेस थांबत नाही यामुळे काही वेळेस विद्यार्थ्यांना शाळेला मुकावे लागते यासाठी आगार विभागाने धुळे ते न्याहळोद स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यां मार्फत होत आहे.

गाव दिशादर्शक फलकची गरज
बाहेर गावाहून येणारे वाहनधारक गावात दिशादर्शक नावाचा फलक नसल्याने हे गाव कोणते आहे हे विचारण्यात त्यांचा वेळ वाया जातो तरी येथे गाव व दिशादर्शक फलक यांचा बोर्ड लावण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

प्रवाशांना पावसाळ्यात व उन्हातानातच ताकत ताटकळत उभे राहावे लागत असून, वयोवृद्ध व बालके यांना बसण्यासाठी सुसव्य असे बस स्थानक व्हावे, दिव्यांग वयोवृद्ध यांना जास्त त्रास सहन करावा लागत असल्याने बस स्थानक होणे गरजेचे आहे.
देविदास जिरे, माजी उपसरपंच