The construction of Saint Narahari Sonar temple in the city is progressing The grandest temple of Sonar Brothers in Maharashtra : शहरातील संत नरहरी सोनार मंदिराचे बांधकाम प्रगती पथावर सोनार बांधवांचे महाराष्ट्रातील सर्वात भव्य मंदिर

दैनिक विश्‍वजगत ः अमोल कल्याणकर

मालेगाव : शहरातील भाविकांच्या पुढाकारातून उभारल्या जात असलेल्या सोनार समाजाचे आराध्य दैवत तथा वारकरी संप्रदायाचे मुकुटमणी श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांचे भव्य असे मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. सदर काम लवकरच पूर्ण होऊन महाराष्ट्रातील हे सर्वात भव्य असे पहिले संत नरहरी सोनार मंदिर दर्शनासाठी सर्वांकरीता खुले होणार असल्याने सुवर्णकार समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

शहरातील जुना कुरळा मार्गावरील श्री संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांचे मंदिर बांधकामाचे भुमिपूजन ८ सप्टेंबर रोजी पुजारी शशिकांत देव महाराज यांच्या पौरोहीत्या खाली करण्यात आले होते . या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून जानगीर महाराज संस्थानचे महंत प. पू. महेश गिरी बाबा, सिद्धेश्वर संस्थानचे प.पू. शांतीपुरी बाबा, संजय बाबा पाचपोर आदी साधु मंहताच्या उपस्थितीमध्ये विधिवत पूजा अर्चा आरती महापूजा करून करण्यात आले होते. या तीन महिन्याच्या कालावधीत संत नरहरी सोनार महाराज मंदिराचे बांधकाम झपाट्याने सुरू करण्यात आले. या मंदिरात गणपती , विठ्ठल रुक्मिणी , संत नरहरी सोनार तसेच महादेव पिंड नंदी यांची सुंदर अशी मूर्ती बसवण्यात येणार आहे. हे मंदिर 40 फूट उंच असून 45 बाय 22 असे हे मंदिर असून आज रोजी मंदिर च्या कळस बांधकाम सुरू असून सदर बांधकाम लवकरच पूर्णत्वास येणार आहे. शहरातील सोनार समाज बांधवांनी एकत्रित येऊन समाज बांधवांच्या सहभागातून संत नरहरी सोनार महाराज यांचे भव्य सुंदर मंदिर व उभारत असल्याने इतरसाठी सुद्धा एक प्रेरणादायी ठरत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हे पहिले भव्य मंदिर उभे राहत असून शहरातील सर्व सोनार समाज बांधवांच्या सहभागातून संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांचे मंदिर बांधकाम पूर्णत्वास येत असल्याने सर्व सोनार समाज बांधवां मध्ये मोठ्या उत्साहाचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे मंदिर पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन समाज बांधव भेट देत आहेत.