70 thousand letters to Sandeep Shelke from across the district; Stated concepts of district development : जिल्हाभरातून संदीप शेळकेंना ७० हजार पत्रे; जिल्ह्याच्या विकासाच्या सांगितल्या संकल्पना
दैनिक विश्वजगत ः गोपाल काटे
बुलडाणा : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली आहे.
बुलडाणा : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली आहे. जनतेचा जाहीरनामा कार्यक्रमातून त्यांनी जिल्हावासियांना विकासाच्या संकल्पना मांडण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर गेल्या ६ महिन्यांत जिल्ह्यातील तब्बल ७० हजार ७३३ जणांनी संदीप शेळके यांना पत्र लिहून विकासाच्या संकल्पना सांगितल्या. तसेच लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आग्रह केला.
गेल्या वर्षभरापासून संदीप शेळके यांनी वन बुलडाणा मिशन ही राजकीय लोकचळवळ सुरू केली. जिल्ह्याच्या शाश्वत व सर्वांगीण विकासासाठी संदिप शेळके कटिबद्ध आहेत. त्यासाठी त्यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संदिप शेळके यांनी लोकसभेसाठी अर्ज भरावा ही जिल्ह्यातील जनमानसाची भावना होती. तशी भावना हजारो नागरिकांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
आपले सामाजिक काम मोठे आहे. जिल्ह्यातील हजारो तरुणांना आपण रोजगार उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन आपल्याकडे आहे. तुमच्यासारखा माणूस संसदेत पोहचला तर जिल्ह्याचा कायापालट होईल. त्यामुळे तुम्ही लोकसभा निवडणुकीत उभे रहावे, आमचे तुम्हाला पूर्ण सहकार्य राहील, असाच बहुतांश पत्रांचा आशय आहे.