At Shemba, Khandoba idol is alive and Nangar ceremony is celebrated with enthusiasm. शेंबा येथे खंडोबा मूर्ती प्राणप्रष्ठापणा व नंगर सोहळा उत्साहात साजरा..!
गजानन काटे : दैनिक विश्वजगत
शेंबा : ‘श्रद्धावान लभते ज्ञानम्, संशयात्मा विनश्यति’ असे भगवदगीतेत भगवंताने अजुर्ना ला सांगितले आहे. अर्थात जी व्यक्ती श्रद्धावान आहे तिलाच ज्ञानाची प्राप्ती होते आणि जे संशय करतात त्यांचा विनाश होतो. श्रद्धेला मोल नाही अशी आपली संस्कृती सांगते, तर आदि शंकराचार्य यांनी त्यांच्या विवेकचूडामणी या ग्रंथात तीन गोष्टींना अत्यंत दुर्लभ मानले आहे.त्या म्हणजे मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम आणि सत्संगत्वम . अर्थात मनुष्याचा देह प्राप्त होणे दुर्मिळ आहे आणि मनुष्याला मोक्षप्राप्तीची इच्छा होणे त्याहून दुर्मिळ आहे.त्याहूनही अति दुर्मिळ काय असेल तर ते म्हणजे सत्संगाची प्राप्ती होय.
नांदुरा तालुक्यातील शेंबा येथे खंडोबा मंदिरात प्राण प्रतिष्ठाणा सोहळा व नंगर सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. शेंबा येथे खंडोबा मंदिर परिसरात तीन दिवस हा सोहळा चालणार आहे. रविवार 21 एप्रिलला रात्रभर खंडेरायाचा जयघोष करत मल्हाराव होळकर, राजमाता अहिल्याबाई यांच्या जीवन चरित्रावर भक्तिमय वातावरणात वाघे मंडळींनी भारुड आणि लोकगीते सादर केली. सदर नंगर सोहळ्यात पंचक्रोशीतील वाघे मंडळांचा मोठ्या उत्साहात सहभाग होता.
मंडळी मोठ्या उत्साहात सामील होऊन नंगर सोहळ्याची शोभा वाढवली.
विशेष हे की मंडळाच्यावतीने जो महाप्रसादचा अर्थात ‘प्रीती भोज’ चा कार्यक्रम केला जातो. तो तर एक प्रकारची शेंबा वासीयांसाठी पर्वणीच होती. प्रीती भोजनाचा कार्यक्रम म्हणजे खंडोबा भक्तांच्या प्रीतीचे सामान्य माणसांना होणारे दर्शनच असते. मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अहोरात्र या उत्सवासाठी राबलेत. धर्म पंथ जात वंश अशा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता समाजातील सर्व आबालवृद्ध स्त्री-पुरुष प्रचंड उत्साहात या खंडोबा महोत्सवात सहभागी होत झाल्यात. ा महोत्सवातून एक प्रकारच्या सामाजिक जाणीवेचा, समाजाप्रती असलेल्या कर्तव्याचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा बोध देणारा संदेश दिला, समाज व्यसनमुक्त व्हावा अशी प्रार्थना मंडळ खंडोबारायाच्या चरणी करत देशात सत्य , धर्म, शांतता, प्रेम, सद्भाव आणि मानवता नांदो अशीही मंडळाच्या वतीने करण्यात आली. हा महोत्सव विदर्भात एक अतिशय महत्त्वाचा उत्सव ठरला.
सप्तऋषिस मनी मल्हारसुर गाजले भारी ।
म्हणुनी अष्टभैरव मार्तंड अवतार धरी ।।
बनाईच्या तपाने देव मल्हारी झाले प्रसन्न
शेेबा नगरी नंगर ठरला यावे वाघे जण ।।
भवसिंधु हा पार कराया कलियुगी साधन ।
विसरू नको मानवा, मार्तंड चरणी लावी मन ।।