21 Arrest of banned fugitives in Democracy c 302 :21 वर्षांपासून क 302 मधील बंदी फरार आरोपीस अटक

आरोपी नामे अनिल प्रल्हाद मोरे राहणार बोराखेडी यास ग्राम रूईखेडा तालुका मुक्ताईनगर येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.


दैनिक विश्‍वजगत : गोपाल काटे
मोताळा: पोलीस स्टेशन बोराखेडी हद्दीतील ग्राम बोराखेडी येथे दिनांक 18/ 9 /2000 रोजी फिर्यादी राजू पुंजाजी गायकवाड राहणार बोराखेडी यांनी रिपोर्ट दिला होता की, यातील नमूद आरोपी नामे अनिल प्रल्हाद मोरे राहणार बोराखेडी याचे व त्याची आई यांचे घरगुती कारणावरून वाद सुरू असतांना आरोपीचा मामा (मृतक) नामे नारायण पुंजाजी गायकवाड राहणार बोराखेडी हे भांडण सोडण्यासाठी गेले असता नमूद आरोपी अनिल मोरे याने त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्याच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने छातीत वार करून खून केला होता.
फी चे रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन येथे अपराध नंबर 62/2000 कलम 302 भारतीय दंड संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास करण्यात आला. सदर गुन्ह्यांमध्ये विद्यमान न्यायालय सेशन कोर्ट बुलढाणा यांनी नमूद आरोपीस जन्मठेप ची शिक्षा ठोठावली होती व त्यास मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे दाखल करण्यात आले होते.

पो.नी.सारंग नवलकार यांच्या पथकाची कारवाई

आरोपी नामे अनिल प्रल्हाद मोरे हा सन 2003 मध्ये मध्यवर्ती कारागृह अमरावती येथून संचित रजेवर गावी बोराखेडी आला होता परंतु आरोपी हा संचित रजा संपल्यानंतर सुद्धा परत कारागृहात हजर झाला नाही वरून पोलीस स्टेशन बोरखेडी येथे फिर्यादी हवालदार विनोद मनोहर लोहकरे, मध्यवर्ती कारागृह अमरावती यांच्या लेखी फिर्यादवरून अप क्र 3026/ 2013 कलम 224 भा.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास करण्यात आला होता.
आरोपी हा 2003 पासून ते अद्याप पावतो फरार होता शोध घेण्याकरिता मा. पोलीस अधीक्षक श्री. सुनील कडासने साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री महामुनी साहेब, यांच्या आदेशाने मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री.सुधीर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नी. सारंग नवलकार यांनी एक पथक 1) पोहेकॉ अरुण सपकाळ, पो.नाईक. प्रवीण पडोळ, पो.नाईक विजय पैठणे यांचे पथक तयार करून पथकाने नमूद आरोपीस आज दिनांक 7/ 4 /2024 रोजी ग्राम रुईखेडा तालुका मुक्ताईनगर जि जळगाव येथे 2/3 दिवस थांबून माहिती काढली असता आरोपी हा त्याचे नाव बदलून राहत होता असे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेऊन पो. स्टे. बोराखेडी येथे आणून अटक करण्यात आली आहे.